esakal | मोठी बातमी : राणा कपूर, वाधवान बंधुंशी संबंधीत 2200 कोटींच्या मालमत्तेवर ईडीने आणली टाच
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : राणा कपूर, वाधवान बंधुंशी संबंधीत 2200 कोटींच्या मालमत्तेवर ईडीने आणली टाच

टाच आणण्यात आलेल्या मालमत्तांची माहिती (राणा कपूर बाजार भाव 1400 कोटी)

  • कंबाला हिल येथील इमारत
  • नेपियन सी रोड येथील तीन ड्युप्लेक्स
  • नरीमन पॉईंट येथील फ्लॅट
  • वरळीतील चार फ्लॅट
  • दिल्लीतील अमृता शेरगिर मार्ग येथील मालमत्ता

मोठी बातमी : राणा कपूर, वाधवान बंधुंशी संबंधीत 2200 कोटींच्या मालमत्तेवर ईडीने आणली टाच

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी तपास करणा-या सक्तवसुली संचलनालयाने (ED) 2200 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ही मालमत्ता येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, धीरज आणि कपील वाधवान यांच्याशी संबंधीत आहे. न्यूयॉर्क, लंडन,ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली आणि पुणे येथील मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.

ED कडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या मालमत्तांचे बाजार भाव 2600 कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील दिल्ली, लंडन व न्यूयॉर्क आदी 1200 कोटी रुपयांची मालमत्ता राणा कपूरशी संबंधीत आहे. तर पुणे, मुंबई, ऑस्ट्रेलिया, लंडन आदी ठिकाणीची 1400 कोटींची मालमत्ता डीएचएफएलशी संबंधीत आहेत. याप्रकरणात एकूण 12 फ्लॅटसह न्यूयॉर्क, लंडन,ऑस्ट्रेलिया, मुंबई, दिल्ली व पुणे येथील मालमत्तांवर टाच आणण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

BIG BREAKING - मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, उद्धव ठाकरेंनी शिवसेना मंत्री आणि नेत्यांची वर्षावर बोलावली बैठक

त्यातील राणा कपूर आणि कुटुंबियांशी संबंधीत मुंबईतील फ्लॅट आणि इतर काही मालमत्तांवर गुरूवारी टाच आणण्यात आली. अजून काही दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचीही ED मधील सूत्रांनी सांगितले. यापूर्वी याप्रकरणी 50 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. 

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होते. या कंपनीत कूपर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समाभाग आहेत.  त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे 3 हजार 700 कोटींच कर्ज होते.  राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या त्यावर प्रकार टाकण्यात आला आहे. हे कर्ज देताना गहाण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत 40 कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किंमतीची असल्याचे दाखवण्यात आले होते

संपादन - सुमित बागुल 

yes bank fraud case property worth 2200 crore of rana kapoor and wadhwan brothers seized by ED