मुंबईत कोरोनाचा बॉम्ब फुटलाय का ? आजही मुंबईत वाढलेत 'एवढे' रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

 24 तासात 1372 रुग्णांची भर तर 41 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 841 वर...

मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच असून आज ही नव्या 1372 रुग्णांची भर पडली असून रुग्णांचा आकडा  23,935 वर पोचला आहे. आज 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 841 वर पोचला आहे. आज सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी 150 रुग्ण गेल्या आठवड्याभरातील आहेत.

आज मुंबईतील विविध परिसरात 1372 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 23,935 झाली आहे. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 1222 रुग्ण आज सापडले असून 150 रुग्ण आठवड्याभरापूर्वीचे आहेत.

आणखीन एक मोठा खुलासा ! असे सापडले होते 'गायब झालेले' अजित पवार....

आज झालेल्या 41 मृत्यूंपैकी 15 मृत्यू हे 6 ते 15 मे दरम्यान झालेले आहेत. तर 32 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष तर 12 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खाली आहे. तर 18 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 22 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 841 झाला आहे. 

हृदय पिळवटून टाकणारं वास्तव ! ग्रामस्थ म्हणतायत कोरोना झाल्यावर उपचार तरी मिळतील पण...

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 826 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 21,707 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 350 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 6,466 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

yet another day when more than 1000 covid 19 patients detected from mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yet another day when more than 1000 covid 19 patients detected from mumbai