हृदय पिळवटून टाकणारं वास्तव ! ग्रामस्थ म्हणतायत कोरोना झाल्यावर उपचार तरी मिळतील पण...

water crisis
water crisis

मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसच्या भयंकर महामारीचं संकट वाढत चाललं आहे. कोरोना व्हायरचा संसर्ग राज्याच्या ग्रामीण भागात  नाहीये. कोरोना व्हायरसची चिंता जरी ग्रामीण भागातल्या लोकांना नसली तरी दुसरी एक भयंकर समस्या दबा धरून बसली आहे. ती म्हणजे दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई. सध्या काही गावांना पिण्याचं पाणीसुद्धा उपलब्ध होऊ शकत  नाहीये. दुर्दैव हेच की कोरोना झाल्यावर उपचार तरी मिळतील हो मात्र पाणीच मिळालं नाही तर जगायचं कसं हा प्रश्न ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसमोर निर्माण झालाय.    

मोखाडात वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या पाणी टंचाईत याही वर्षी जव्हार, मोखाडा हे दोन्ही तालुके होरपळून निघाले आहेत. मार्च महिन्यापासूनच दोन्ही तालुक्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मोखाड्यातल्या ८५ गावपाड्यांना तब्बल २६ , तर जव्हारमधल्या ९  गावपाड्यांना ४  सरकारी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र प्रत्येकाला फक्त २० लीटर एवढा  तुटपुंजा पाणी पुरवठा सरकारी धोरणानुसार होत असल्यामुळे इथले आदिवासी रणरणत्या उन्हात तहान भुकेची चिंता न करता  पाण्यासाठी पायपीट करत आहेत.

 बरं सरकारनं इथला पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही असं नाहीये. जव्हार, मोखाड्यातली पाणी टंचाई दुर व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारनं जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना इथे राबवली आहे. प्रत्येक टंचाईग्रस्त ग्रामपंचायत हद्दीत करोडो रूपयांचे बंधारे, सिमेंट नाला बांध, सलग समतोल चर, दगडी बांधकाम या सारखी कामं करण्यात आली आहेत. मात्र  ही सर्व कामं सपशेल अपयशी ठरल्याचं यंदाच्या पाणी टंचाईनं दाखवुन दिलं आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही इथल्या आदिवासींच्या नशिबी पाणी टंचाई आली आहे. 

  शासनाकडून प्रति व्यक्ती फक्त २० लिटर पाणी मिळत असल्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना पिण्यासाठीही ते पाणी पुरत नाहीये. त्यामुळे टॅंकरचं पाणी विहीरीत टाकताच पाणी मिळवण्यासाठी इथले आदिवासी एका एका पाण्याच्या थेंबासाठी जीवाची पर्वा न करता विहरींवर तुटून पडत आहेत. हे करूनही गरज असेल तितकं पाणी मिळत नसल्यामुळे या आदिवासींना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. 

जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही: 

गेल्या काहीं वर्षांपासून प्रति व्यक्ती २० लिटर पाणी या सरकारी धोरणानुसार टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र आता हे पाणी जनावरांना पिण्यासाठी द्यायचं की स्वतः प्यायचं असा प्रश्न या आदिवासींसमोर निर्माण झाला आहे. २० वर्षांपासून सरकारकडून या गावांकडे दुर्लक्ष केलं जातंय.  त्यामुळे या आदिवासींसमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

huge water crisis at mokhada and javhar read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com