
Maharashtra Minister Yogesh Kadam
esakal
ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत घायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. पुण्यातील गोळीबार प्रकरणानंतर फरार गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ यांना योगेश कदम यांच्या शिफारशीमुळे शस्त्र परवाना देण्यात आला होता. त्यामुळे योगेश कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.