अखेर सोमण सक्तीच्या रजेवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌मध्ये योग्य शिक्षण मिळत नसल्याने संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. 13) मध्यरात्रीपर्यंत कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नमते घेत सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌मध्ये योग्य शिक्षण मिळत नसल्याने संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. 13) मध्यरात्रीपर्यंत कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने नमते घेत सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

आजची महत्वाची बातमी 'आजके शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाबाबत भाजपने घेतला निर्णय, काॅंग्रेस म्हणतंय...

नाट्यशास्त्र विभागात योग्य शिक्षण मिळत नसल्याची तक्रार काही महिन्यांपासून विद्यार्थी कुलगुरूंकडे पत्राद्वारे करत होते. या पत्रांची दाखल घेण्यात येत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. सोमवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले आणि संचालकांची हकालपट्टी होत नाही, तोवर माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. अखेरीस मुंबई विद्यापीठ प्रशासनाने मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌चे संचालक सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे पत्र विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

हे सुद्धा वाचा.. कौटुंबिक कारणांमुळे शर्मिला ठाकरेंनी टाळली मुख्यंत्र्यांची भेट?

नाट्यशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. विषय शिकवत असताना प्रात्यक्षिक दाखवले जात नाही. त्यामुळे विषय पूर्णपणे कळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून अध्यापन झालेले नाही. अनेकदा प्राध्यापक त्यांच्या विषयांऐवजी अन्य विषय शिकवण्यासाठी पाठवले जातात. त्यामुळे परिपूर्ण शिक्षण मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.

Yogesh Soman on compulsory leave


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogesh Soman on compulsory leave