'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाबाबत भाजपने घेतला निर्णय, काँग्रेस म्हणतंय..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मुंबई - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्ताचाच्या वादावर भाजपकडून अखेर पडदा टाकण्यात आलाय. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी अखेर माफी मागितली आहे. दरम्यान हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे अशी माहिती भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. दरम्यान या प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही असं देखील जावडेकर यांनी म्हटलंय. 

बापरे - दोन दिवसांत त्यांनी संपवले 500;  अस्तित्वचं मिटवलं...
 
छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही, असंही प्रकाश जावडेकर म्हणालेत. 

हे वाचलंत का ? भयंकर, धक्कादायक.. वसईत विद्यार्थ्यांना गुदमरण्याचे प्रशिक्षण?

काँग्रेसचं आंदोलन मागे : 

भाजपकडून प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेण्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसने देखील या पुस्तकाविरोधातील आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. आज राज्यभरात काँग्रेसतर्फे या पुस्तकाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार होतं.  याबद्दलची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

धक्कादायक - आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..

महाराष्ट्रातील जनतेने या पुस्तकाविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला आणि म्हणून प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेण्याची घोषणा केली असं बाळासाहेब थोरात म्हणालेत. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने माफी मागावी असं देखील बाळासाहेब थोरात म्हणालेत. काँग्रेसकडून या पुस्तकाविरोधात आज आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आलंय 

Webtitle : prakash javadekar informs about taking aaj ke shivaji narendra modi book back congress rolls back agitation

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash javadekar informs about taking aaj ke shivaji narendra modi book back congress rolls back agitation