esakal | तुम्ही आधी नीट उभे राहा; हातवारे करु नका, कोर्टानं अर्णब गोस्वामींना खडसावलं
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही आधी नीट उभे राहा; हातवारे करु नका, कोर्टानं अर्णब गोस्वामींना खडसावलं

अर्णब यांना आता 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. बुधवारी सकाळी अटक केल्यानंतर दुपारी अर्णब यांना 1 वाजण्याच्या सुमारास अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. 

तुम्ही आधी नीट उभे राहा; हातवारे करु नका, कोर्टानं अर्णब गोस्वामींना खडसावलं

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः बुधवारी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर साडे सहा तास सुनावणी झाल्यानंतर  त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अर्णब यांना आता 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. बुधवारी सकाळी अटक केल्यानंतर दुपारी अर्णब यांना 1 वाजण्याच्या सुमारास अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. 

मुंबई पोलिस आणि रायगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले होते. आपल्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा अर्णब यांनी कोर्टात केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.  त्यानुसार वैद्यकीय तपासणी झाली आणि आता कोर्टाने अर्णब यांना 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

पुन्हा एकदा गोस्वामींनी केलेल्या आरोपावर कोर्टात न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी गोस्वामी यांनी कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. गोस्वामी कोर्टात गेले, तिथे तेव्हा त्यांनी काही हातवारे केले. तसंच त्यावेळी ते इशारे ही करत होते. गोस्वामी यांचे हातवारे बघून आणि त्यांचं हे वर्तन बघून न्यायाधीश चांगलेच भडकले. त्यांनी लगेचच गोस्वामी यांना समज देत, तुम्ही आधी नीट उभे राहा, हातावारे करु नका, असं म्हटलं.

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

न्यायाधीशांनी समज देताच अर्णब गोस्वामी यांचं न्यायालयातील वागणं बदललं आणि ते शांत सुनावणी ऐकत होते. दरम्यान गोस्वामी यांना मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला.  पोलिसांकडून कोर्टात अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र कोर्टाने ती फेटाळली. 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागमध्ये दाखल एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करत पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर आज दुपारी ३ वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. तिथेही अर्णब यांच्यावतीने जामीन अर्ज केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

You stand up first Don't make gestures  the court reprimanded Arnab Goswami

loading image