धक्कादायक! 'त्या' तरुणानं रुग्णालयातच संपवलं स्वतःचं आयुष्य; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का.. 

मिलिंद तांबे 
Thursday, 9 July 2020

शहाजी चेंबूरच्या न्यू भारत नगर परिसरातील महालक्ष्मी वेल्फर सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत रहात होता.

मुंबई: कॅन्सरवर उपचार सुरू असलेल्या तरुणाने आजारपणाला कंटाळून केईएम रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या रुग्णाचे नाव शहाजी खरात (20) असून या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 शहाजी चेंबूरच्या न्यू भारत नगर परिसरातील महालक्ष्मी वेल्फर सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत रहात होता. दरम्यान त्याल्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार सुरू होते.

हेही वाचा: सिप्ला कंपनीने आणलं जगातील सर्वात स्वस्त रेमेडेसीविर जेनेरिक औषध! जाणून घ्या किंमत

 

मात्र कर्करोगाचा त्रास वाढल्याने अखेर जूनमध्ये त्याला उपचारासाठी परळच्या के.ई.एम रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच वेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. 

के.ई.एममध्ये शहाजीला वार्ड नंबर 11 मध्ये उपचार सुरू होते. मात्र या दुर्धर आजाराने त्याचे मनोबल खचले आणि त्याने रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वार्डमधील लोखंडी अँगलला कपड्याच्या मदतीने गळफास घेतला.  

नैराक्षेतून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली. भोईवाडा पोलीस घटनास्थळी भेट देऊन अपमृत्यू म्हणून नोंद केली आहे.

हेही वाचा: मुंबईकरांना हायअलर्ट, थोड्याच वेळात समुद्रात उंच लाटा उसळणार

"कर्करोगाने ग्रासले असल्यामुळे शहाजीने आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे", असे भोईवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद कांबळे यांनी सांगितले आहे.  

संपादन: अथर्व महांकाळ 

young man ended his life in KEM Hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man ended his life in KEM Hospital