VIDEO : ये मेरा इलाका है म्हणत दारुड्यानं रेल्वे रुळावर मारला ठिय्या; स्टेशनवर गोंधळ, रेल्वे सेवा विस्कळीत

लोकल जवळ आली तरी हा तरुण रुळावर ठाण मांडून बसला होता.
Kalyan Railway Station
Kalyan Railway Stationesakal
Summary

स्टेशनवरील आजूबाजूचे प्रवासी, रेल्वेतील प्रवासी त्या तरुणाला बाजूला होण्यास सांगत होते. परंतु, तो त्यांना ये इलाका मेरा है असे म्हणत तेथेच बसून होता.

डोंबिवली : लोकल जवळ आली तरी हा तरुण रुळावर ठाण मांडून बसला होता. मोटरमननं हॉर्न देऊनही तो काही हटण्यास तयार नव्हता. ''ये मेरा इलाका है...मै कही भी बैठ सकता हू'' असं तो म्हणत होता. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ (Kalyan Railway Station) ही घटना घडली आहे.

कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) जाणाऱ्या लोकलच्या मोटरमननं अखेर प्रसंगावधान राखत लोकल थांबविली. सदर तरूणाला रेल्वे रुळावरुन बाजूला करत लोकल मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आली. मद्यपान केलेल्या या तरुणाने रेल्वे रुळावर गोंधळ घातल्याने काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

Kalyan Railway Station
Monsoon Update : राज्यात जोरदार पाऊस बरसणार; 'हा' पक्षी थेट आफ्रिकेतून आला सांगावा घेऊन..

याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटाच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा गोंधळ नेमका कशाने झाला याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Kalyan Railway Station
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप 350 जागा जिंकणार; उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

फलाट क्रमांक 1 जवळ 'ये इलाका मेरा है, मै यहा रहता हू, कही भी बैठ सकता हू'' असे सांगत एक तरुण थेट रेल्वे रुळांवर जाऊन बसला. या दरम्यान कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल कल्याण स्टेशन वरून सुटली. लोकल आपला वेग पकडणार तोच मोटरमनला रेल्वे रुळावर एक व्यक्ती बसलेली दिसली. मोटरमननं हॉर्न देऊनही हा तरुण तेथून हलत नव्हता.

स्टेशनवरील आजूबाजूचे प्रवासी, रेल्वेतील प्रवासी त्या तरुणाला बाजूला होण्यास सांगत होते. परंतु, तो त्यांना ये इलाका मेरा है असे म्हणत तेथेच बसून होता. अखेर मोटरमननं लोकल थांबवित खाली उतरुन त्या तरुणाला बाजूला केले. याची माहिती स्टेशन मास्तर, जीआरपी यांना देण्यात आली.

Kalyan Railway Station
Ashadhi Wari : धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी! पंढरपूरला जाण्यासाठी तब्बल 'इतक्या' बसेसची सोय

त्यांनी येऊन त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर लोकल पुढील दिशेला रवाना झाली. या घटनेमुळे काही काळ लोकल सेवा विस्कळीत झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत. तरुणाने नशा केलेली असून त्याची मानसिक स्थिती देखील ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com