जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात

अनिश पाटील
Monday, 30 November 2020

जोगेश्वरीतील 22 वर्षीय तरुणीला  फेसबुकवरील मित्राने पार्टीला बोलावून महिलेला मद्यपाजून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेताहेत.

मुंबईः  जोगेश्वरीतील 22 वर्षीय तरुणीला  फेसबुकवरील मित्राने पार्टीला बोलावून महिलेला मद्यपाजून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेताहेत.

जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मोहित शहा नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. फेसबुकद्वारे एकमेकांशी वारंवार संवाद साधत असल्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. पीडित तरुणही एकटीच राहात होती. नुकतीच पीडित तरुणीनं तिची खोली बदलली. तिने भाड्याने नवीन खोली घेतली होती. ही माहिती तिने शहाला सांगितली. त्यावर शहाने तिच्याकडे पार्टीची मागणी केली असता. पीडित तरुणी पार्टी द्यायला नकार देऊ शकली नाही. 27 नोव्हेंबरला  सायंकाळी आरोपी शहा हा बिअरची बाटली घेऊन पीडित तरुणीच्या घरी आला. दोघांनी मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी नशेत धुंद होती. 

अधिक वाचा-  KEMमधील कोव्हिशील्ड 95 स्वयंसेवकांना लसीचा दुसरा यशस्वी डोस

तरुणीच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन शहा याने तिच्यावर 3 वेळा अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर आपल्यासोबत शहाने गैरकृत्य केल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीनं जोगेश्वरी पोलिस ठाणे गाठले. तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 376 भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस आरोपीचा शोध घेताहेत.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

A young woman from Jogeshwari hurt by Facebook friend


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young woman from Jogeshwari hurt by Facebook friend