Dombivali News : नैराश्यातून तो 12 व्या मजल्यावर सज्जावर जाऊन बसला; अग्निशमन दलाने वाचविले प्राण

लोढा संकुल येथील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावर तरुण जाऊन बसला होता.
Aniket Pawar
Aniket PawarSakal
Updated on
Summary

लोढा संकुल येथील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावर तरुण जाऊन बसला होता.

डोंबिवली - लोढा संकुल येथील एका इमारतीच्या 12 व्या मजल्यावर तो जाऊन बसला होता. परिसरातील नागरिकांनी सुरुवातीला त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला परंतू तो काही एकत नव्हता. अखेर जागरुक नागरिकांनी या विषयी अग्निशमन दलास माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आत्महत्येचा विचार करणारा तो तरुण वरतून खाली उडी मारण्यासाठी उभा राहीला तोच जवानांनी त्याच्या अंगावर दोरीचा फास टाकून त्याला वर खेचले. जवानांच्या या प्रसंगावधानामुळे 32 वर्षीय अनिकेत पवार याचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

गुरुवारी रात्री 7.30 च्या दरम्यान पलावा अग्निशमन दलास कॉल आला की डोंबिवलीतील लोढा संकुलातील परिसरातील आर्चिड एल इमारतीतील 12 व्या मजल्यावरील सज्जावर एक तरुण बसला आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तरुण हा बाराव्या मजल्यावर बसला असल्याचे दिसून आले. अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी सुधीर दुसिंग, कर्मचारी विकास चव्हाण, सुरेश गायकर यांनी तरुणाला खेचण्यासाठी दोरीचा फास बनवला. एवढ्यातच तरुण वरतून खाली उडी मारण्यासाठी उभा राहिला त्याच दरम्यान जवानांनी क्षणाचाही विचार न करता त्याच्या अंगावर दोरीचा फास टाकत त्याला दोरीने वर खेचून घेतले.

त्यानंतर पवार याला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी दुसिंग यांनी सांगितले. अनिकेत पवार हा या सोसायटी मध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. आर्थिक व कौटुंबिक विवंचनेतून त्याला नैराश्य आले असून त्यातून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या कार्यतत्परतेमुळे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे प्राण वाचले असून जवानांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com