
मुंबई: हाजीअली परिसरात रविवारी रात्री उशिरा भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात कारमधील तरुण आणि तरुणी जखमी झाले असून, तरुणीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. सध्या तिच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.