बर्फ, ज्यूसमधून इफिड्रीन तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - विविध हॉटेल आणि पबमध्ये बर्फ, ज्यूस आणि आइस्क्रीमच्या माध्यमातून इफिड्रीन या अमली पदार्थाचा व्यसनासाठी वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. अंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री तरुणाला अटक केली. त्याच्याकडे 20 लाखांचे इफिड्रीन सापडले. 

गुजरात राज्यात इफिड्रीन पावडरची तस्करी होत आहे. काही तस्कर मुंबईत त्याची विक्री करत असल्याची माहिती अंबोली पोलिसांना मिळाली होती. अंधेरी परिसरात एक तस्कर येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने तेथे सापळा रचला. मंगळवारी रात्री सराटेपाड्यात मोहंमद नदीम शफीक खान आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याच्याकडे इफिड्रीनचा साठा सापडला. 

काय आहे इफिड्रीन? 
इफिड्रीन हे "एमडी' या अमली पदार्थाला पर्याय म्हणून व्यसनासाठी वापरतात. बर्फात त्याची भुकटी मिसळून तो बर्फ विविध पब, हॉटेलमध्ये पाठविले जातो. डिस्कोमध्ये आइस्क्रीम, ज्यूस, दारूमध्ये टाकून त्याचे व्यसन केले जाते. या पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असते.

Web Title: youth arrested Iffidine from ice, juice