

Social Media
ESakal
डोंबिवली: सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आर्थिक फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत विश्वास संपादन करणे, प्रेमसंबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर संबंधित तरुणींच्याच नावावर बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून फरार होणे, असा आरोपीचा कार्यपद्धतीचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे.