एकत्र राहण्याच्या आणाभाका, २ वर्ष शरीरसंबंध ठेवले, तरुणीनं लग्नाचा तगादा लावताच तरुणाचं धक्कादायक कृत्य
Crime News: बदलापूर येथे एका तरुणाने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : बदलापूर येथे राहणाऱ्या एका तरुणाने पनवेल येथे राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला तिच्या जातीवरुन शिवीगाळ करुन तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.