कोरोना योद्ध्यांची तहान भागवण्यासाठी तरुणांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मे 2020

कोरोनाने मुंबईत थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांची तहान भागवण्यासाठी मुंबईतील तरुण पुढे आले आहेत. सर्वसामान्यानांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांची तहान भागविण्यासाठी या तरुणांनी तब्बल दोन लाख रुपये किंमतीचे तीन हजार टेट्रा पॅक नारळ पाणी पोलिसांमध्ये वितरित केले. 

मुंबई : कोरोनाने मुंबईत थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांची तहान भागवण्यासाठी मुंबईतील तरुण पुढे आले आहेत. सर्वसामान्यानांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांची तहान भागविण्यासाठी या तरुणांनी तब्बल दोन लाख रुपये किंमतीचे तीन हजार टेट्रा पॅक नारळ पाणी पोलिसांमध्ये वितरित केले. 

टिळक नगर (चेंबूर) येथील होतकरु तरुण अमित तांबेवाघ आणि सचिन शिंदे या तरुणांनी नीलगाय फूड लिमिटेड यांच्या सौजन्याने तब्बल दोन लाख रुपये किंमतीचे तीन हजार टेट्रा पॅक नारळ पाणी टिळक नगर पोलीस ठाणे, कुर्ला ट्रॕफिक पोलीस बांधवांना वाटले. 

सर्वात मोठी बातमी - राज्यात 21 मे नंतर कोरोनाचा नवीन रुग्ण नसणार, वाचा काय आहे अहवाल

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सतत वाढत असल्यामुळे चिंता वाढलेलीच आहे. मुंबईत काल गुरुवारी (ता. ३०) तब्बल 417 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 290 झाला आहे. आतापर्यंत 10,030 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. कालपर्यंत 45 रुग्ण बरे झाले असून, 1472 रुग्णांना घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांपैकी 108 रुग्ण हे मुंबईच्या बाहेरचे असून ते मुंबईत उपचारासाठी दाखल होते. 

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

अशा परिस्थितीत राजधानी मुंबईच्या रस्त्यांवर मुंबईकरांच्या संरक्षणाची जबाबदारी चोख बजावणाऱ्या पोलिसांची तहान भागवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या या तरुणांची प्रशंसा होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth On Road To Provide Food To Police Chembur Mumbai