‘विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयामध्ये प्रवेश द्या’ युवा सेनेची उच्च शिक्षणमंत्र्यांकडे मागणी 

तेजस वाघमारे
Wednesday, 16 September 2020

विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी अनुदानित विधि महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित विधी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्या विद्यार्थ्याला अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असते. मात्र दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना विनाअनुदानित महाविद्यालयातच प्रवेश घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयात रिक्त जागा असतानादेखील त्यांना प्रवेश घेता येत नाही त्यामुळे ही जाचक अट रद्द करुन विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी अनुदानित विधि महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी युवा सेनेतर्फे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचे नेतृत्व खासदार संभाजीराजे भोसले यांनी करावे; शिवसेनेची लेखी मागणी

अनुदानित महाविद्यालयात प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विनाअनुदानित विधी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. मात्र त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अनुदानित विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची गरज भासते. विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षी विनाअनुदानित महाविद्यालयच प्रवेश घेण्याची परवानगी असते. त्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुसऱ्या वर्षी विनाअनुदानित महाविद्यालयातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेण्याची परवानगी देण्याची मागणी युवा सेनेतर्फे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuva Senas demand to give admission to law students in aided colleges