देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील A टू Z मुद्दे..

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील A टू Z मुद्दे..

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा  कार्यकळ संपण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. राज्यपालांच्या सांगण्यावरून देवेद्र फडणवीस पुढील सरकार स्थापन होईपर्यंत किंवा राज्यपालांचे पुढील आदेश येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. दरम्यान, पत्रकार परिषदेत काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस 

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस

  • मी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला, राज्यपालांनी माझा राजीनामा स्वीकारला 
  • गेली पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली त्याचे देवेद्र फडणवीस यांनी मानलेत आभार 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अध्यक्ष अमित शाह आणि कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांचे मानलेत आभार  
  • गेल्या पाच वर्षात आमच्या सोबत असलेला मित्रपक्ष आणि त्यांचे नेते या सर्वांचे मी आभार मानतो 
  • शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला मारत देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार 
  • या पाच वर्षात पारदर्शी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्रात सरकार चालवलं
  • गेल्या पाच वर्षात सर्वांसोबत एकत्रित संकटांचा सामना समर्थपणे केला
  • गेल्या पाच पैकी चार वर्ष दुष्काळाची आणि सध्याचं वर्ष अतिवृष्टीचं गेलं, आम्ही शेतकर्यांसोबत उभे होतो आणि आहोत
  • गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी जालायुक्त शिवार सारखी योजना राबवता आली 
  • महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, रेल्वे आणि सर्वच श्रेत्रात चांगलं आणि मोठ्या प्रमाणात काम करू शकलो याचा आनंद आहे  
  • विधानसभेत आम्ही महायुतीम्हणून महाराष्ट्रासमोर गेलो  
  • निवडणुकांच्या निकालानंतर आमचा विजय मोठा आहे, आमचा स्ट्राईकरेट ७० % पेक्षा जास्त राहिलाय 
  • आम्ही महाराष्ट्रात जे केलं त्याची पावती महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला दिली 
  • प्रामाणिकपणे आम्ही काम केलं म्हणून आम्हाला जनतेने आम्हाला निवडून दिलं
  • उद्धव ठाकरे यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत 'सरकार बनवण्याचे आमचे मार्ग खुले आहेत' असं बोलणं अत्यंत बुचकळ्यात टाकणारं  
  • लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं त्यामुळे 'आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे  बोलणं धक्कादायक' 
  • आम्ही पहिलेच स्पष्ट केलेलं कि महायुतीचा सरकार स्थापन करेल 
  • गेल्या पंधरा दिवसात शिवसेनेकडून आलेली वक्तव्य वेदनादायक आहेत  
  • माझ्यासमोर कधीही अडीच वर्षांच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता.. एकदा अडीच वर्षांच्या चर्चेवर बोलणी होऊन फिस्कटली होती.. दिवाळी वेळी झालेली चर्चा अनौपचारिक चर्चा होती 
  • अमित शाह आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी काही बोलणं झालं असले तर ते मला ठाऊक नव्हतं.. भाजपची आताची भूमिका अत्यंत प्रामाणिक आहे 
  • गेल्या काळातील गैसमज आपसात बोलणी करून हे आपापसात संपवता आलं असतं  
  • मी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन केले ते त्यांनी घेतलेले नाही, आमच्याकडून चर्चेची दारं खुली होती.. आमच्याशी चर्चा न करता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी शिवसेना चर्चा करतंय 
  • आम्ही कायम संवाद साधण्याचा प्रयत्न केला  
  • सेनेच्या आजूबाजूची लोकं ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत ते दरी वाढवण्याचं काम करतायत 
  • ज्या भाषेत कमेंट केल्या जातायत त्यापेक्षा जबरदस्त भाषेत आम्ही वक्तव्य करू शकतो, मात्र आम्ही जोडणारी लोकं आहोत तोडणारी नाही.  
  • भाजपच्या वतीने कधीही बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा अपमान झालेला नाही
  • गेल्या पाच वर्षात आणि गेल्या १० दिवसात शिवसेनेकडून आमचे नेते मोदी यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली गेली  
  • विरोधात असताना टीका केली जाते मात्र, ही टीका आम्हाला मान्य नाही 
  • आमच्या धोरणांवर  बोलण्याव्यतिरिक्त आमच्या नेत्याबद्दल वारंवार वक्तव्य केली जातायत
  • मोदींबद्दल बोलणं योग्य नाही. असंच सुरु असेल तर आम्ही सरकार कशाला चालवायचं हे हा देखील प्रश्न आहे 
  • माननीय राज्यपालांनी मला काळजीवाहू CM म्हणून काम करायला सांगितलं आहे
  • कोणताही धोरणात्मक, नवीन निर्णय मला घेता येणार नाही. ते सांगतील तोपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करेन  
  • जनादेशाचा अनादर करणं अत्यंत चुकीचं आहे
  • काही लोकं जाणीवपूर्वक वक्तव्य करतायत, आमचे नेते आमदार फोडण्याचं काम करतायत, त्यांना माझं खुलं आवाहन आहे त्यांनी माफी मागावी 
  • मी रेकॉर्डवर सांगतो आम्ही कोणतेही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही 
  • भाजप सरकार येत्या काळात सरकार स्थापन करेल हा मी विश्वास देतो 
  • आभार मानत असताना जनतेला लवकर सरकार देऊ शकलो नाही याची खंत वाटते असं 
  • फडणवीस यांनी मिडियाचे आणि विरोधीपक्षाचे आभार मानलेत

WEB TITLE : A to Z pointers of devendra fadanvis press talk after resigning as CM on maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com