esakal | महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन.. 'आम्ही 162' कार्यक्रमातील A टू Z मुद्दे..
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन.. 'आम्ही 162' कार्यक्रमातील A टू Z मुद्दे..

महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन.. 'आम्ही 162' कार्यक्रमातील A टू Z मुद्दे..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्ताबाजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आज मुंबईतील  हॉटेल 'हयात'मध्ये पाहायला मिळाली. सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीच्या गोटात आता खलबत पाहायला मिळतायत. अशातच आता यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून सर्व आमदारांचं मनोबल वाढवण्याचे प्रयत्न आता शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला. याचसोबत महाविकास आघाडीकडून आपलं संख्याबळ दाखवण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय.

यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोराथ, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. 

कार्यक्रम सुरु होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा केली. दरम्यान कार्यक्रमाच्या हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या घोषणा देखील देण्यात आल्यात

कार्यक्रमाच्या सुरवातीला अशोक चव्हाण यांनी आमदारांना संबोधन केलं. सध्या आपलं संख्याबळ 162 जरी असलं तरीही येत्या काळात आपलं संख्याबळ वाढताना दिसेल. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने हा निर्णय घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. यानंतर बाळासाहेब थोराथ यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केलं. दरम्यान निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी आपण एकत्र आलोत. २३ तारखेला झालेला शपथ विधी अल्पमतातील आहे असं म्हणत फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यपालांना आलेल्या 162 सह्यांचं पत्र देखील राज्यपालांना दिल्याचं त्यानी सर्वाना सांगितलं.  त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यानी सर्वांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे  

 • आपली लढाई सत्तेसाठी नाही 'सत्या' साठी आहे. 
 • आपण तीनही पक्ष आणि मित्र पक्ष मिळून मजबूत आहोत
 • "मी असं म्हणत नाही मी पुन्हा येईन",
 • आमचा रस्ता मोकळा करा, जर आडवं येण्याचा प्रयत्न केला तर तसं एकदा करून पाहा  
 • हातपाय मारण्याचा प्रयत्न करायचाय तर अधिक करा 
 • आम्ही केवळ ५  वर्ष  खुर्च्या उबवण्यासाठी एकत्र आलेलो नाही  
 • आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रातून सुरवात करतोय, फक्त सत्तेसाठी पुढे येणार्यांना गाडून टाकू

उद्धव ठाकरे यानंतर शरद पवार यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला. शरद पवार यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सर्वांसमोर मांडले  

काय म्हणालेत शरद पवार : 

 • महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा घेऊन निर्वाचित झालेल्या आमदारांचं अभिनंदन 
 • महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करून  सत्तास्थापण्याचा संकल्प सिद्धीस नेऊ 
 • आज केद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी देशातील काही भागात बहुमत नसताना सत्ता स्थापन केली 
 • कर्नाटक ,गोवा, मणिपूरचं शरद पवार यांनी उदाहरण दिलं  
 • सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे भाजपने दाखवलं 
 • जिथे चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन झाली तिथे केसेस सुरु आहेत  
 • आता महाराष्ट्राची वेळ आली आहे.. 
 • उद्या आपण सामोरं जायला तयार आहोत, ज्या दिवशी सुप्रीम कोर्ट आदेश देईल तो पाळण्याची आपली तयारी आहे. 
 • काही जण आपल्या मनात  शंका निर्माण करण्याचं काम करतायत
 • अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आणि पक्षाच्या विरोधात 
 • 'व्हीप'ची  अंमलबजावणी केली नाही तर सदस्यत्व जाईल अशी भीती दाखवली जातेय.  
 • आता अजित पवार यांना पक्षाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही 
 • घटना  आभासाकांकडून आम्ही माहिती घेतली आहे 
 • सस्पेंड झालेल्यांना आदेश द्यायचा अधिकार नाही
 • कुणीही घाबरू नका, याची सर्वस्वी जवाबदारी मी स्वतः घायायला तयार आहे 
 • बहुमतासाठी मतदान होईल, यामध्ये १६२ पेक्षा जास्त मत देऊन ते स्पष्ट करू 
 • सत्याच्या मार्गाने, संसदीय मार्गाने चालणारे सरकार स्थापन करू 
 • दोन, तीन दिवस सुप्रीम कोर्ट  सांगेल.. त्यानंतर राज्यपालांना तुम्हाला बोलवायला लागेल 
 • हे गोवा नाही हे महाराष्ट्र आहे 
 • महाराष्ट्र काहीही खपवून घेत नाही, आपण योग्य ला योग्य अयोग्यला अयोग्य समजतो 
 • आतापर्यंत आम्ही धडा शिकवण्याचं काम करतच  होतो. पण आता शिवसेनापण सोबत आहे
 • इतर राज्यात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही 

शरद पवार यांच्या संबोधनानंतर सर्व आमदारांना सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली .   

WebTitle : A to Z updates of 162 event hosted by mahavikas aaghadi