
मुंबईत कोविड मृत्यूला बगल; आठव्या दिवशी शून्य मृत्यू
मुंबई : मुंबईत सलग ८ व्या दिवशीदेखील शून्य मृत्यूची (Zero corona patients) नोंद झाली आहे. कोविडची तिसरी लाट (corona third wave) सुरू झाल्यापासून मुंबईत १४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली. आजही मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली असून आता मुंबईत (Mumbai corona update) सलग गेल्या ८ दिवसांत एकही कोविड मृत्यू झालेला नाही.
हेही वाचा: मुंबई : हवामान बदलामुळे सोमवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
जानेवारीत एक वेळ, फेब्रुवारी महिन्यात ९ वेळा; तर मार्च महिन्यांत ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. आज मार्च महिन्यातील चौथ्या दिवशी ही मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली असून आता मुंबईत गेले ८ दिवस सतत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये १४ वेळा; तर संपूर्ण कोरोना कालावधीत २२ वेळा शून्य मृत्यू नोंदवले गेले आहेत. आज केवळ ७८ नवीन रुग्ण आढळले असून कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १०,५६,८०७ वर पोहोचली आहे. आज १२७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १०,३६,६३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५,६४५ दिवस झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा साप्ताहिक दरही ०.०१ पर्यंत खाली आला आहे. आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांचा एकूण आकडा १६,६९१ वर स्थिर आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे.
Web Title: Zero Corona Deaths Continues On Eighth Day Mumbai Corona Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..