esakal | पालघरमध्ये भाजपा-मनसे युतीचा प्रयोग फसला
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil and Raj Thackeray

पालघरमध्ये भाजपा-मनसे युतीचा प्रयोग फसला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: शिवसेनेने (shivsena) काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्वतंत्र चूल मांडल्यामुळे कधीकाळी परस्परांचे खूप चांगले मित्र असलेली शिवसेना-भाजपाची युती तुटली. त्यानंतर भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (mns) जवळीक वाढू लागली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेमध्ये युती होऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. मध्यंतरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपा-मनसे युतीच्या चर्चेने जोर धरला होता.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक झाली. पालघरच्या वाडामध्ये सापणे पंचायत समितीमध्ये भाजपा-मनसे युतीचा प्रयोग झाला. पण हा प्रयोग फसल्याचं दिसतं आहे. सापणेची जागा मनसेकडे होती. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे इथे निवडणूक लागली.

हेही वाचा: 'भाजपाने एकट्याने लढूनही...' ZP निकालावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

भाजपा आणि मनसेने परस्परांना सहकार्य केले. पण प्रत्यक्षात इथे शिवसेनेचा फायदा झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे मोकाशी सापणे गणातून विजयी झाले आहेत. खरंतर या युतीमुळे शिवसेनेचं नुकसान अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात भाजपा आणि मनसेला फटका बसलाय. मनसेला हातातली जागा गमवावी लागली आहे.

loading image
go to top