esakal | 'भाजपाने एकट्याने लढूनही...' ZP निकालावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danve

'भाजपाने एकट्याने लढूनही...' ZP निकालावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: "महाविकास आघाडी सरकारने (mva govt) ओबीसी आरक्षण (obc reservation) रद्द होऊ नये, यासाठी सुप्रीम कोर्टात (supreme court) बाजू मांडली नाही. इम्पिरिकल डाटा दिला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या निवडणुका घ्याव्या लागल्या" असं केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे (Raosasheb danve) यांनी म्हटलं आहे.

"जनमताचा कौल राज्यातला ओबीसी समाज भाजपाच्या बाजूने आहे. सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी ही निवडणूक झाली. भाजपा एकटी २२ जागांवर जिंकली शिवसेना सात जागांवर, काँग्रेस १२ आणि एनसीपीने १० जागांवर विजय मिळवला" असे दानवे म्हणाले.

हेही वाचा: ZP Election 2021: पालघरमध्ये शिवसेनेला मोठा झटका, खासदाराच्या मुलाचा पराभव

"भाजपाच्या बाजूने बहुमत आहे. तीन पक्ष असताना भाजपा एकटा लढतोय अशा परिस्थितीतही भाजपाच्या बाजने कौल दिला आहे. या सरकारवर ओबीसी समाज नाराजा असल्याचे दिसून येते. अनिल देशमुख यांच्या कटोलमध्ये भाजपा उमेदवार निवडून आला, हा सरकार विरोधात जनतेने व्यक्त केलेला अंसतोष आहे" असे अनिल देशमुख म्हणाले.

हेही वाचा: अमोल मिटकरींना मोठा धक्का, बच्चू कडूंच्या 'प्रहार'ची एंट्री

"अजून एक मिनी विधानसभेची निवडणूक बाकी आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत त्या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरेल" असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

loading image
go to top