DCM Sunetra Pawar
Esakal
मुंबई - पुणे जिल्हा परिषदेच्या दोन प्रलंबित प्रश्नांवर बुधवारी निर्णय घेण्यात आला. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध जागा जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तातडीने प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.