चेतना तरंग : खोटे बोलणारा निष्पाप असतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

तुमच्या ओळखीचा एक स्नेही तुमच्याशी खोटे बोलतो आणि ते तुमच्या लक्षात येते. तुम्हाला अशा वेळी काय वाटेल?

चेतना तरंग : खोटे बोलणारा निष्पाप असतो

  • १. दुःख

  • २. क्रोध

  • ३. फसगतीची जाणीव

  • ४. निराशा

  • ५. करुणा

  • ६. भ्रमनिरास

  • ७. अनादराची भावना

  • ८. आश्चर्य

  • ९. धक्का

  • १०. लाज

काही दिवसांपूर्वी कुणीतरी माझ्याशी खोटे बोलले. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्याच्याबद्दल प्रेम वाढले. कारण, ती व्यक्ती एक चतुर खोटारडी नव्हती. जर ती चाणाक्ष खोटारडी असती, तर तिचे खोटे बोलणे माझ्या ध्यानातच आले नसते. ती इतका निष्पाप आणि निष्कपट होती की, तिला चांगले खोटे बोलता येत नव्हते. तिचे खोटे लगेच उघडे पडले. जर ती पकडली गेली नसती, तर ती खोटारडी आहे, हे कसे कळले असते?

म्हणजेच तुम्ही एक चाणाक्ष खोटारडा पकडू शकत नाही. ज्याला तुम्ही खोटारडा म्हणून ओळखता, तो हुशार खोटारडा नाहीच. तो तर साधा भोळा, निष्पाप आहे. होय ना?

म्हणून वर यादी केलेल्या सर्व मानसिक कसरती न करता त्या खोट्या व्यक्तीसाठी प्रेमात विरघळून जा!

आपण किती भाग्यवान आहोत?...

ही एकच बाब नेहमी स्मरणात असू द्या. जेव्हा तुम्हाला तुमच्या भाग्याचे विस्मरण होईल, तेव्हा तुम्ही दुःखी व्हाल. दुःख सांगते की...

१) तुम्ही नकारात्मक गुणांचा संग केला आहे आणि

२) तुम्ही सकारात्मक गुणांचा संग केला आहे!

तुमचे दुर्गुण तुम्हाला दुःखात लोटतात. तसेच तुम्ही किती महान आहात, किती सगुणांनी परिपूर्ण आहात, याची जाणीव कधी कधी तुम्हाला दुसऱ्यांना दोष देण्यास उद्युक्त करते. तुम्ही दुसऱ्याला तुच्छ मानू लागलात, की दुःखी व्हाल.

परंतु अशा दुःखामुळेच तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे परत येणे शक्य होईल. आत्मा तर पूर्ण आनंदच आहे, पण याची जाणीव केवळ ज्ञानोपासनेमुळेच होऊ शकते. अशी जाणीव अथवा हे ज्ञान दुःखाचे बोट धरून त्याला आत्म्याकडे नेते. ज्ञानाशिवाय दुःख पूर्णत्वाकडे न जाता वाढत जाते. ज्ञानाने मात्र दुःखाला पूर्णत्व येते. केवळ ज्ञानाच्या शक्तीमुळे आपण दुःखाला ओलांडून पलीकडे जाऊ शकतो.

loading image
go to top