नैसर्गिक जगात मुलांना रमू द्या 

sadguru-isha-foundation
sadguru-isha-foundation

आजकाल मुलांच्या कुतूहलाची जागा या www या इंटरनेट विश्वानं घेतलीय. वयाचं सहावं वर्ष लागायच्या आधीच त्यांना साऱ्या विश्वाची माहिती आहे. पण तुम्ही शास्त्रज्ञांकडं पाहिलंत तर, ते कधी नव्हे इतक्या विचित्र अवस्थेत आहेत - ते दिशाहीन झालेत, कारण विश्वात कुठल्याही दिशेला पाहिलं तरी आधी पेक्षाही आणखीन अधिक गूढ काहीतरी त्यांना वाटतंय. उदाहरणच द्यायचं तर, ते आपल्याला सांगत आहेत की कोट्यवधी आकाशगंगा आहेत ब्रम्हांडात, नुसते तारे नव्हेत तर अब्जावधी आकाशगंगा. अधिकाधिक शोध घेतल्यावर तुम्हाला कळेल, हे विलक्षण कुतूहल आणखीन वाढेल कारण या अस्तित्वाच्या वास्तविक स्वरूपाची तुम्हाला कल्पना येईल. 

आजकाल लोकांचं कुतूहलच संपलंय, कारण आपण ज्याला ज्ञान म्हणतोय त्या अस्तित्वाबद्दलच्या मूर्ख, भ्रामक निष्कर्ष आहेत. आज माणसांमधील हा एकाग्रतेचा अभाव ते एखाद्या पदवीसारखा मिरवतायेत. सृष्टीतील कोणत्याही गोष्टीकडं पुरेशा एकाग्रतेनं ध्यान दिलं, तरच आपल्याला तिचा ठाव लागू शकतो. आपण साध्य करू शकतो. लोकांची जडणघडणच अशी झालीये, की ते कशावरच लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. पण अशा एकाग्रतारहित अवस्थेत लोकांना कशाचंच कुतूहल वाटणार नाही, डोक्यात फक्त घट्टपणे बांधलेले निष्कर्ष असतील. तुमच्या डोक्यात सतत एकपात्री विचारांचं थैमान चाललेलं असेल, आकलन असणार नाही. तुमच्यात आकलन असल्यास तुमच्या डोक्यातला गोंधळ लगेच थांबेल. एखाद्या अतिशय सुंदर आणि विलोभनीय गोष्टीकडं तुम्ही पाहत असाल, तर सर्वकाही विरामतं. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठीच लोकं सिनेमाची मजा लुटतात, चित्रपटगृहातील दिवे बंद केलेले असतात आणि पूर्ण वेळ लक्ष फक्त त्या सिनेमाकडं असतं. तुमच्या डोक्यातील तुमचे स्वतःचे गोंधळ काहीकाळ विराम पावतात - दुसरंच काहीतरी तिथं घडत असतं. सिनेमात पुढं काय घडणार हे माहिती नसल्यानंच तो तुम्हाला खिळवून ठेवतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांचं लक्ष विचलित झालं नसल्यानं, त्या दिवशी सिनेमागृहात त्यांच्याच बाबतीत काहीतरी घडलंय असं त्यांना वाटू लागतं. पडद्यावर घडणारी घटना त्यांचं लक्ष्य आकर्षित करायला कारणीभूत असते. खरंतर दीर्घकाळ अविचल लक्षच तुम्हाला तो अनुभव देतं. ही ध्यानाची जणू प्राथमिक पायरी आहे, जिला ‘धारणा’ म्हणतात. 

प्रत्येक शाळेनं असा एखादा उपक्रम मुलाच्या अभ्यासक्रमात आणला पाहिजे , ज्यात मुलांना काही काळ निरंतर लक्ष केंद्रित करणं भाग असेल. मग ते संगीत किंवा नृत्य असेल. एकाग्रपणे लक्ष पुरवल्याशिवाय तुम्ही संगीत किंवा नृत्यही करू शकत नाही. पण तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. मुलांना टॉर्च आणि मोबाईलशिवाय, अंधारात, पण पूर्णपणे सुरक्षित अशा वातावरणात जंगलात फिरायला घेऊन गेलात तरी पुरेसं आहे, तुम्ही पाहाल त्यांची एकाग्रतेनं वागण्याची क्षमता आणि आत्यंतिक कुतूहलाची भावना जागृत झालेली दिसेल. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या गोष्टीची सर्वच पालकांनी दखल घेतलीच पाहिजे. मुलांचं संगोपन म्हणजे त्यांना फक्त शाळेत घालणं नव्हे. ते मार्क्स, ग्रेड्स आणि यासारख्या व्यर्थ गोष्टी कमावतील. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही क्षेत्रात तुमच्या मुलांनी पूर्णपणे विकसित झालं पाहिजे, तेव्हाच ते खरोखर यशस्वी होतील. फक्त मार्क्स मिळवून ते यशस्वी होणार नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com