ब्रेन फिटनेससाठी काय करावे? 

file photo
file photo

आपण फिटनेस हा शब्द शारीरिक किंवा मानसिक आरोग्याबद्दल वापरतो. पण, "ब्रेन फिटनेस' ही एक नवीन संकल्पना आहे. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत सतत बदल होत असतात. जे आपण आज शिकतो ते उद्या आपल्याला अपडेट करावे लागते. आपल्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत जीवनात होणाऱ्या या बदलांशी जुळवून घेणे आणि दैनंदिन जीवनातील मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवणे म्हणजे ब्रेन फिटनेस. असे आढळून आले आहे की मेंदू हा आपल्या शरीरातील एक सर्वांत जास्त बदल करता येण्याजोगा भाग आहे. आपण दररोज आपल्या मेंदूचा वापर कसा करतो यावरून आपल्या मेंदूची कार्यक्षमता ठरते आणि ती वाढवता येते. वाढत्या वयानुसार होणाऱ्या अल्झायमर, स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी ब्रेन फिटनेस महत्त्वाचे आहे. 

निरोगी जीवनशैली, नियमित शारीरिक आणि मानसिक व्यायाम, संतुलित पोषण, पुरेशी झोप, बुद्धिबळ खेळणे, कोडी सोडवणे, नवीन गोष्टी शिकणे यासारखे मानसिक व्यायाम मेंदूच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी "सिक उत्तेजन' देतात. नियमित पद्धतशीर मानसिक उत्तेजनामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होते. 

योगावर आधारित ब्रेन फिटनेस 
सूर्यनमस्कार, अधोमुख श्‍वानासन, उत्तानासन, सर्वांगासन केल्याने मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो. वृक्षासन, नटराजासन या तोल सांभाळून करण्याच्या आसनांमुळे एकाग्रता वाढते. श्‍वास घेणे हे केवळ ऑक्‍सिजनपुरते मर्यादित नाही, तर श्‍वासोच्छवासाची लय मेंदूचे कार्य, स्मरणशक्ती आणि भावनिक निर्णयक्षमता यांच्याशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. कपालभातीच्या अभ्यासाने एकाग्रतेशी संबंधित मेंदूचा भाग सक्रिय होतो. 

भ्रस्त्रिका, अनुलोम विलोम, चंद्रभेदन, शीतली, भ्रामरी प्राणायामामुळे मेंदूला रक्तप्रवाह वाढून त्यातील पेशींचे कार्य सुधारते. नादयोग म्हणजे ध्वनिलहरींवर आधारित मंत्रोच्चार, ओंकार जप, भ्रामरी प्राणायाम यामध्ये निर्माण होणारी कंपने मेंदूच्या भागात सकारात्मक प्रभाव पाडतात. भ्रामरी प्राणायामाचा प्रभाव "ब्रेन टॉनिक'सारखा आहे, असे समजता येईल. 

ध्यान केल्याने मेंदूतील ग्रे मॅटरचे प्रमाण वाढून सतर्कता आणि भावनांवर नियंत्रण वाढते. ज्ञानमुद्रा, आकाश मुद्रा यामुळे स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, आकलनशक्ती आणि एकाग्रता वाढते. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर बराच वेळ लक्ष एकाग्र करायचे असल्यास दोन्ही हातांच्या बोटांची टोके एकमेकांना जोडून हाकिनी मुद्रा केल्यास मेंदूचा स्मरणशक्तीशी संबंधित भाग सक्रिय होतो. ज्योती किंवा बिंदूवर लक्ष केंद्रित करून त्राटक क्रिया केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com