video : योग ‘ऊर्जा’ : स्व-जागरूकतेचा 'योग्य' साधूया...

Yoga
Yoga

Life is a fine balance of ‘Making it happen’ and ‘Letting it happen.
हेच तत्त्व योगातही आहे म्हणूनच योगामध्ये आयुष्य कसं जगावं याच्या गाइडलाईन्स आहेत. योगशास्त्रात एके ठिकाणी साधक तत्त्वात ‘साहस’, ‘धैर्य’ आणि ‘निश्‍चय’ याबद्दल लिहिलं आहे, तिथेच ‘प्रयास’ (exertion) आणि ‘नियमाग्रह’ हे बाधक म्हटले आहेत. आपल्या अस्तित्वाच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक, वैयक्तिक, कार्मिक आणि आध्यात्मिक अंगांवर योग वेळोवेळी मार्गदर्शक ठरू शकतो, थोडी ज्ञानाची भूक असेल तर! त्यासाठी महर्षी पतंजली स्वाध्यायाचं महत्त्व सांगतात.

1) बौद्धिक 
स्वाध्याय म्हणजे बुद्धीला कुशाग्र आणि सूक्ष्म बनवण्यासाठी योग्यता उत्पन्न करणाऱ्या शास्त्रांचे व ग्रंथांचे वाचन. त्याचप्रमाणे आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी काय करावं तर ‘यत्न’ (प्रयत्न) आणि ते कसे करावे तर ‘दीर्घकाळ’ आणि ‘नैरन्तर्य’ (न कंटाळता व खंड न पडू देता) तर दृढभूमी तयार होते.

2) शारीरिक 
शरीराच्या सुदृढतेसाठी आसनांचा उपयोग तर आपल्या सर्वांना माहीत आहेच. आसने केल्याने स्थिरता, आरोग्य, हलकेपणा येतो. सर्व स्नायूंना योग्य व्यायाम घडला म्हणजे त्यांचे व सर्व अवयवांचे, रक्त वाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते. 

3) मानसिक 
शरीरातील मल स्वच्छ करण्याबरोबरच मनातील मलही काढला पाहिजे. मनातील मल म्हणजे -
विपर्यय (भास)
विकल्प
अविद्या
अस्मिता (मीपणा)
राग (लालसा) द्वेष
अभिनिवेश (देहबुद्धी) स्त्यान (अकर्मण्यता) संशय
आलस्य
अविरती (विषय वासना)
दौर्मनस्य इ.

यावर पतंजलींनी ठोस उत्तरंही दिली आहेतच. या विषयांचा नक्की अभ्यास करावा, अशी ही कालातीत मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
अभ्यास
विवेक वैराग्य
क्रियायोग
प्रणव जप
एक तत्त्व अभ्यास
चित्त प्रसादनम्

गीतेमध्ये श्रीकृष्णाने कठोर शब्दांत अर्जुनाद्वारे आपल्याला सांगितलं आहे, 
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप । |
म्हणजे हृदयाचा क्षुद्र दुबळेपणा टाक आणि ऊठ

आपण गीतेतील संदर्भ घेताना कर्मयोगावर बोललो नाही तर विषय अपुरा राहील.

4) कार्मिक  
कर्मयोगाची व्यावहारिक अंमलबजावणी (प्रॅक्टिकल इंप्लिमेंटेशन) करणे म्हणजे आनंदी आणि समाधानी आयुष्याची रेसिपी. आपण गीता वाचली किंवा अभ्यासली नाही तरीही आपल्याला कर्मयोग लागू आहेच. त्यापेक्षा वाचून त्यातून काही शिकणं जास्त शहाणपणाचं ठरेल.

  • आपल्यासमोर आलेलं कर्तव्य कर्म उत्कृष्ट करावं.
  • ते करत असताना आपली क्षमता विकसित करणं, हे मध्यवर्ती आहे.
  • आपल्या जगण्यात अर्थपूर्णता आणतो, तो कर्मयोग.
  • कर्मफळाच्या अपेक्षेपासून विरक्ती, पण कर्म तन्मयता.
  • ती येते कर्म अर्पण भावनेने आणि वरीलप्रमाणे केल्याने.

आजच्या स्पर्धेच्या जगात प्रगती करूनही कर्मयोग कसा साधता येऊ शकतो, ते आपण पुन्हा केव्हातरी पाहू.
सामाजिक व वैयक्तिक पातळीवर योगाचे इंप्लिमेंटेशन ‘यम’ आणि ‘नियम’ हे सांगतात. ते तुमच्या होमवर्कसाठी ठेवते. इतकं सगळं वाचून नेमकं करायचं काय असं वाटू शकतं. या सगळ्याचा गाभा आणि सुरुवात दैनंदिन जीवनातील जागरूकतेत, ‘जाणिवेत’ आहे. Self Awareness! अवधानपूर्वक सर्व व्यवहार करत असताना, जाणिवेतून करू ते उच्च पातळीचंच कार्य असेल. पुन्हा भेटू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com