esakal | योग ‘ऊर्जा’ : योगासने V/S व्यायाम
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

योगशास्त्राचा ‘आसन’ हा छोटासा भाग आहे. योगासनात संपूर्ण शरीराचा वापर होत असल्याने साहाजिकच व्यायामाशी तुलना होते. यामुळे देशात व परदेशात योगासनांमध्ये विविधता, कल्पकता आणून त्यातून अनेक व्यायाम प्रकार निर्माण झाले, मात्र यात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि आसनांचा उपयोग एकांगी होतो. आज आपण योगासन आणि व्यायामात काय फरक आहे पाहू.

योग ‘ऊर्जा’ : योगासने V/S व्यायाम

sakal_logo
By
देवयानी एम., योग प्रशिक्षक

योगशास्त्राचा ‘आसन’ हा छोटासा भाग आहे. योगासनात संपूर्ण शरीराचा वापर होत असल्याने साहाजिकच व्यायामाशी तुलना होते. यामुळे देशात व परदेशात योगासनांमध्ये विविधता, कल्पकता आणून त्यातून अनेक व्यायाम प्रकार निर्माण झाले, मात्र यात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि आसनांचा उपयोग एकांगी होतो. आज आपण योगासन आणि व्यायामात काय फरक आहे पाहू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 • आसनांमध्ये शरीरात स्थिरता आणणे अपेक्षित आहे. स्नायूंवर व हृदयावर अतिरिक्त ताण न देण्यावर भर.
 • व्यायामात शरीराच्या गतीवर भर असल्यामुळे स्नायूंवर व हृदयावर ताण पडतो.
 • आसनांमध्ये जागरूकता महत्त्वाची आहे. कोणत्याही आसनात लक्ष त्या भागावर केंद्रित करणे व श्वासावर लक्ष ठेवणे मुख्य गाभा.
 • गाणी ऐकताना, गप्पा मारताना व्यायाम करतो. जिममध्ये अनेकदा मोठ्याने संगीत ऐकत व्यायाम केला जातो. यावेळी श्‍वासाला महत्त्व द्यावे.
 • आसनांमध्ये शरीरात योग्य व रक्ताभिसरण होते. आसनांनी ताजेपणा येतो. थकणे अपेक्षित नाही.
 • व्यायामात असमानतेने रक्ताभिसरण होते. काम केले जाणाऱ्या स्नायूंवर भर असतो. त्यामुळे थकवा जाणवतो.
 • आसनात आकुंचन, प्रसरण किंवा पीळ देतो त्याच्या विरुद्ध दिशेनेही आसन केले जाते. त्याला ‘Counter pose’ म्हणतात. याने शरीराच्या दोन्ही बाजूंवर समान लक्ष दिले जाते.
 • व्यायामात कमी-अधिक ताण पडत असल्याने एक बाजू जास्त वापरली जाण्याची शक्यता.
 • आसनात शांत आणि सुनियंत्रित हालचाली असल्याने पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था कार्यान्वित होऊन झीज कमी होते. आसनात दुखापत होण्याची शक्यता कमी. 
 • व्यायामात वेगवान व हिसका देणारे प्रकार असल्याने सिम्पेथेटिक मज्जासंस्था कार्यान्वित होऊन झीज वाढते. दुखापत होण्याची शक्यता अधिक.
 • आसनांचा परिणाम आंतर इंद्रियांवर झाल्याने फायदा दीर्घकाळ टिकतो.
 • व्यायामात अधिक भर स्नायूंवर असल्याने परिणाम दीर्घकाळ टिकत नाही. व्यायाम सोडल्यावर शरीर काही काळात पूर्ववत होते.
 • आसनांनी मन शांत व एकाग्र होते. कारण योग शरीर व मनाला वेगळे करून आपले अस्तित्व दुभंगत नाही.
 • व्यायामात ऍड्रेनलिन वाढवणारे प्रकार असल्याने मनाला उत्तेजन मिळते. शरीराच्या विकासाचा विचार अधिक केला जातो.
 • योग आंतरिक प्रवासाचा मार्ग असल्याने, आसनांचा उपयोग शरीर निरोगी ठेवणे इतकाच आहे. कारण ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ म्हटले आहे, तसं शरीर हे फक्त ‘साधन’ आहे. जीवनाचे अंतिम ध्येय स्वतःची पारदर्शकतेने खरी ओळख करून घेणे, हे योगातील सर्व आयामांनी साध्य होते.
 • व्यायामात शरीर सुडौल होणे हा उद्देश. आंतरिक ध्येय गाठण्यासाठी शारीरिक अस्तित्वाच्या पलीकडील वाट शोधण्यासाठी योगाकडेच वळावे लागेल.
 • कोणताही व्यायाम प्रकार चांगला किंवा वाईट नाही, आपण इथे फक्त शास्त्रीय दृष्ट्या विषय समजून घेत आहोत. आपल्या जीवनात या सर्वांचा तारतम्याने समावेश केला पाहिजे. शरीर निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे, पण फक्त शरीराचे आरोग्य हे अंतिम ध्येय नाही.

Edited By - Prashant Patil

loading image