
उपाय...
वजन कमी करणे, हे पहिले पाऊल असू शकते.
समाजाच्या व्याख्येनुसार परिपूर्ण शरीराच्या मागे लागताना टीन एजर्स नेहमीच आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तरुणांवर क्रॅश डाएट आणि अतिव्यायामाचा सतत मारा केला जातो.
टीन एजर्स मुलींनी आरोग्यदायी जीवनशैलीसाठी हे करावे...
आपले शरीर आतून निरोगी असते, तेव्हा बाहेरही त्याचे प्रतिबिंब आपोआप उमटते. आपल्या आंतरिक सौंदर्याचे महत्त्व समजून घेऊन खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करूयात.
कुटुंबाच्या आरोग्यात महिलेचे आरोग्यही खूप महत्त्वाचे असते. स्त्रीचा आनंद प्रामुख्याने आरोग्यावर अवलंबून असतो. दुर्दैवाने आरोग्य म्हणजे केवळ ‘परफेक्ट फिगर’ असा समज महिलांमध्ये दिसतो. विशेषतः टीन एजर्स मुलींमध्ये तो सामान्यच. तुम्हाला माझा एक अनुभव सांगते. एका १५ वर्षीय मुलीची आई माझ्या क्लिनिकमध्ये मुलीसाठी वजन घटविण्याचा सल्ला मागण्यास आली. मुलीला तपासल्यानंतर तिची रक्तचाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यावर ती म्हणाली, ‘‘तिच्या रक्तामध्ये काही दोष असेल, असे मला वाटत नाही. तिला फक्त वजन कसे कमी करायचे ते सांगा.’
प्रत्येकालाच मला असे सांगायचेय की, तुम्ही कधी स्वतःच्या शरीरामध्ये डोकावलात का? केवळ बाह्यरूप आणि वरवरच्या आकाराच्या पलीकडे खूप काही असते. ती म्हणजे, तुमची वैद्यकीय सुस्थिती. कोणत्याही मुलीसाठी १२ ते २२ हे वय भावी आयुष्याचा पाया असतो. या काळात तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे या वयात वैद्यकीय सुस्थिती अधिक महत्त्वाची असते. ती आतूनच तंदुरुस्त असल्यास पौगंडावस्थेसह आयुष्यातील गर्भारपण, प्रसूतीसारख्या विविध टप्प्यांनाही तोंड देऊ शकते. मुलीच्या रक्तचाचण्या का करायला हव्यात, याचे हेच कारण होय. उदा. हिमोग्लोबिन, लोह, रक्तक्षय तपासण्यासाठी ब-१२, ड-३ जीवनसत्त्व, हाडांमधील कॅल्शियमची चाचणी आदी विविध घटकांबद्दल रक्तचाचणीतून समजू शकते. थायरॉइडची चाचणीही करायला हवी.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
टीन एजर्स मुलींमधील सामान्य समस्या...
रक्तक्षय
खालील लक्षणे तपासा
वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास मुलीला डॉक्टरकडे घेऊन जा. योग्य निदानासाठी रक्ताची चाचणी करा. तिच्या रक्तात लोहच्या कमतरतेचा रक्तक्षय किंवा ब-१२ जीवनसत्त्वाचीही कमतरता असू शकते.
वैद्यकीय स्थितीनुसार आहारात योग्य ते बदल करा. दैनंदिन आहारात लोह, ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, ‘ब-१२’ जीवनसत्त्वयुक्त तसेच प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
पीसीओएस किंवा पीसीओडी
आजच्या पिढीत पीसीओएस सामान्य आजार बनलाय. त्यामुळे संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होते. यामागची प्रमुख कारणे अशी...
सामान्य लक्षणे
पीसीओएसमुळे रक्तदाब, इन्शुलिनच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. रक्तातील साखरेची पातळी वाढते. याशिवाय हायपोथायरॉडिझमशीही त्याचा संबंध असू शकतो. यातून गर्भ राहण्यातही अडचणी येऊ शकतात. वरील लक्षणे असणाऱ्या कोणत्याही मुलीने तज्ज्ञांकडून तपासणी करायला हवी. योग्य पावले उचलावीत.