video : लॉकडाउनमध्ये वजन घटविण्यासाठी...

Weight-Loss
Weight-Loss
Updated on

आपल्या सर्वांना कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लॉकडाउनमध्ये अडकून पडावे लागणे दुर्देवी आहे. मात्र, त्याचवेळी आरोग्याचे ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींसाठी ही चांगली संधी आहे. यापैकी वजन कमी करणे, हेही अनेकजणांचे ध्येय असते. मी गेल्या दहा वर्षांपासून अनेक रुग्णांना वजन नियंत्रित करून आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मदत करतेय. या काळात मला वजन घटविण्याच्या मार्गातील प्रमुख अडथळे ओळखता आले. ते खालीलप्रमाणे...

1) एषोरामी जीवनशैलीमुळे विविध पार्ट्यांना जाण्याचे, स्वत: पार्टीला जाण्याचे प्रमाण वाढलेय.
2) विविध चमचमीत अन्नपदार्थांचे पर्याय वाढत आहेत. त्यामुळे, आरोग्यदायी पदार्थ निवडणे अवघड बनतेय.
3) नियमित व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ न मिळणे.
4) कामाचे वाढते तास आणि दररोजच्या प्रवासात अधिक वेळ जात असल्याने पुरेशी झोप नाही.

सध्याचा लॉकडाउनचा विचार केल्यास वरीलपैकी कोणताहा मुद्दा सध्या लागू पडत नाही. आपली जीवनशैली बदलण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. तुम्ही व्यवस्थित झोपू शकता.

तुमच्याकडे व्यायामासाठीही पुरेसा वेळ आहे. तुम्ही आहारातही सातत्य ठेवू शकता. दररोज तासभर योग, प्राणायाम आणि इतर व्यायामप्रकार करा. तुम्हाला तुमचे आरोग्याचे ध्येय गाठण्यात त्याचा फायदा होईल. मला एक महत्त्‍वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचाय तो म्हणजे, अशा परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती सर्वाधिक महत्त्वाची असते. आपण कोणत्याही परिस्थितीत तिचे नुकसान करणे टाळले पाहिजे. त्यामुळेच मी वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट  टाळण्यास सांगते. अशा डाएटमुळे तुमच्या शरीरावर ताण पडतो आणि स्वत:चे रक्षण करण्याची क्षमताही कमी होऊ शकते. त्यामुळे, पोषक, संतुलित आहारात सातत्य ठेवा. स्वत:ला प्रेरित करा. सुरुवात करा. तुमचे व्यग्र जीवन विस्कळित होऊ न देता आपण आपल्या आरोग्याचा मजबूत पाया घालू शकता. आपण रोग्यदायी सवयी रुजवू शकतो, ज्या लॉकडाउननंतही उर्वरित आयुष्यभर सुरू राहतील, अशी आशा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com