
आध्यात्मिक प्रक्रिया तुमच्यात घडते, ती काही तुम्ही वर बघता, खाली बघता किंवा तुमच्या आसपास बघता म्हणून घडत नाही, ती घडते जेव्हा तुम्ही तुमच्या आत बघू लागता. आत बघणे म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम अशा कुठल्याच दिशांकडे बघणे नव्हे. जे काही तुमच्या आत आहे, त्याला कोणतेच परिमाण नाही. अशी गोष्ट जी आयामरहित आहे, तीला तोच सामोरे जाऊ शकतो जो स्वतःमध्ये प्रामाणिक आहे.
आध्यात्मिक प्रक्रिया तुमच्यात घडते, ती काही तुम्ही वर बघता, खाली बघता किंवा तुमच्या आसपास बघता म्हणून घडत नाही, ती घडते जेव्हा तुम्ही तुमच्या आत बघू लागता. आत बघणे म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम अशा कुठल्याच दिशांकडे बघणे नव्हे. जे काही तुमच्या आत आहे, त्याला कोणतेच परिमाण नाही. अशी गोष्ट जी आयामरहित आहे, तीला तोच सामोरे जाऊ शकतो जो स्वतःमध्ये प्रामाणिक आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल, तर तुमचा मार्ग सरळ किंवा वाकडा, वर किंवा खाली असो, तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. तुम्हाला थोडसे साहसी वाटावे म्हणून ही सगळी वैशिष्ट्ये तयार केली गेली होती, कारण खरे पाहता, येथे कुठलाच मार्ग नाहीये.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या क्षणी, तुम्ही जे काही अनुभवता ते केवळ तुमच्या आत अनुभवण्यावाचून तुमच्याकडे इतर कुठलाही मार्ग नाहीये. जे काही घडते, ते फक्त तुम्ही तुमच्या आतच अनुभवता, बाहेर नाही. हे संपूर्ण जग आणि तुमच्याबाबतीत जे काही घडले, ते तुमच्या आतच आहे. पण तुम्ही ते बाहेर काढून सर्वत्र पसरवले. बाहेर आहे असे वाटते, पण तो तो एक भ्रम आहे. जर तुम्ही बाहेर प्रक्षेपित करणे थांबवले, तर सर्वकाही तुमच्या आतच आहे. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणे शिका, त्यासाठी इतर कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका.
फक्त सहज इथेच राहा. ते आपसूकच घडून येईल, कारण कुठेही जाणे-येणे नाही. जेव्हा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही, तेव्हा तुम्ही ‘त्या’ मार्गावर असाल. तो सरळही नाही आणि वेडावाकडाही नाही, ना तो लांब आहे ना तोकडा. तो तुमच्या आत आहे आणि तुमच्या आत म्हणजे ती काही दिशा नव्हे. हे असे काहीतरी आहे, जे आपले मन समजू शकत नाही. कारण, जेव्हा तुम्ही ‘मार्ग’ हा शब्द वापरता, तुमचे मन स्वाभाविकपणे विचार करते की कुठेतरी जायचे आहे. पण तुम्हाला कुठेही जायचे नाहीये, तरीसुद्धा याचा अर्थ खुंटणे असा होत नाही. याचा अर्थ फक्त ‘कुठेही नाही जायचे’ बस्स एवढाच होतो, ‘कुठेतरी जायचे नव्हे.’ ‘कुठेतरी जायचे’ याला ठरावीक मर्यादा आहे, म्हणजे फक्त एवढे किंवा तेवढे, पण ‘कुठेही नाही’ हे तर असीमित आहे, नाही का? ‘काहीतरी’ याचा अर्थ एक ठरावीक प्रमाण असा होतो. ‘काहीही नाही’ याला काहीच प्रमाण नाही. याची एक वेगळी व्याप्ती आहे, जी मोजता येण्याजोगी नाही. ही एक अशी वेगळी शक्यता आहे, जिला सुरुवातही नाही आणि अंतही नाही. ‘कुठेतरी’ ही अतिशय सीमित जागा आहे आणि तिथे जाणे फायदेशीर ठरणार नाही. ‘कुठेही नाही’ ही एक अमर्याद जागा आहे. म्हणून आम्ही कुठेही जायचे नाही असे म्हणतो, कुठेतरी जायचे असे म्हणत नाही, कारण हा प्रवास सीमितापासून असीमितापर्यंत आहे. ‘काही नाही’ हीच एकमेव असीमितता आहे. कुठेही नाही हीच अशी एकमेव जागा आहे, जी अनंत आहे.