इनर इंजिनिअरिंग : तुमचे कर्म नव्याने लिहायला शिका....

इनर इंजिनिअरिंग : तुमचे कर्म नव्याने लिहायला शिका....

‘कर्म’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘कृती’ आहे. विविध प्रकारच्या कृती आहेत - शारीरिक, मानसिक, भावनिक आणि प्राण ऊर्जेच्या स्तरावरची कृती. कदाचित प्राण ऊर्जेच्या स्तरावरची कृती तुम्हाला अनुभवता आली नसेल, पण शारीरिक, मानसिक आणि भावनिक कृती तुम्हाला कळल्या असतीलच. तुमच्या जन्माच्या क्षणापासून आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीचा अवशेष किंवा प्रभाव तुमच्यामध्ये आहे. या प्रभावांमुळेच तुम्ही आज ज्या प्रकारच्या व्यक्ती आहात, तसे तुम्ही स्वतःला घडवले आहे. हे प्रभाव तुमच्या स्मृती, तुमची शरीररचना, तुमच्यातील रासायनिक प्रक्रिया आणि प्राण ऊर्जेच्या स्तरावर आहेत. तुम्ही तुमचे कर्म गमावू नये याची खात्री करण्यासाठी या सर्व आधारभूत प्रणाली आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुम्ही मानसिकदृष्ट्या वेडे झालात, तरी तुम्ही ते गमावणार नाही. तुम्ही तुमचे शरीर जरी सोडले, तरी तुम्ही ते गमावणार नाही कारण ते तुमच्या प्राण ऊर्जेवरच बिंबित केले गेले आहे. तुम्ही पाहाल; ज्याप्रकारे तुमच्यातील प्राण ऊर्जा कार्य करते, हे दोन व्यक्तींमध्ये भिन्न असते. प्रत्येकाची विचार करण्याची आणि अनुभवण्याची रीत वेगळी असते, कारण ज्याप्रकारचे प्रभाव त्यांच्यावर झाले आहेत त्याप्रमाणे ते वागतात. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास कर्म अशी कार्यप्रणाली आहे, जी तुम्ही स्वतःसाठी अजाणतेपणे लिहित असता. तुम्ही कसे आहात किंवा कोण आहात हे तुम्ही स्वतःसाठी लिहिलेल्या कार्यप्रणालीवर अवलंबून असते.

आयुष्यात तुम्ही विचार कसा करता, कशाप्रकारे अनुभूती करता, तुमची आयुष्याची समज आणि आकलन कसे करता हे तुमची कर्मप्रणाली नियंत्रित करत असते. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कर्माच्या चौकटीत अडकला आहात. तुम्ही या क्षणी सजग होऊन कार्य केल्यास स्वतःसाठी पुढील क्षणातील कर्म बदलू शकता. भूतकाळात तुम्ही जे केले, ते या क्षणाचे कर्म आहे. तुम्ही काल काय केले, हे तुम्ही बदलू शकत नाही, परंतु आता तुम्ही काय करता हे तुम्ही नेहमीच बदलू शकता. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, ज्या प्रकारचे कार्य - शारीरिक, मानसिक आणि भावनिक - तुम्ही या क्षणी करता ते तुमच्या जीवनाचा दर्जा ठरवते. तुम्ही प्राण ऊर्जेद्वारे कृती केल्यास आम्ही तिला क्रिया म्हणतो.

कर्म बंधनकारक आहे. क्रिया मुक्त करणारी आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमचे शरीर, मन किंवा भावनांच्या ऐवजी प्राण ऊर्जेने कृती करता, तेव्हा संपूर्ण कार्मिक संरचना ढिली पडते. तुम्ही कार्मिक बंधनांचा पायाच मुळात हलवल्यावर तुम्हाला स्वतःमध्ये आणि बाहेर नवीन प्रकारची मुक्तता जाणवते. मी अशा अनेक लोकांना पाहिलेय ज्यांनी एक साधी क्रिया करायला सुरुवात करताच ते सर्जनशील बनले. ज्या गोष्टींची त्यांनी कल्पनाही केली नव्हती, त्या ते करायला लागले. म्हणून तुम्ही काहीतरी अजाणपणे तयार करू शकत असाल, तेच तुम्ही जाणीवपूर्वक देखील करू शकता. तुम्ही ते जाणीवपूर्वक लिहिल्यास फक्त तुमचे कल्याण करणारी कार्यप्रणालीच लिहाल. पण, हे याबद्दल नाहीये की, जगात कोणी कधी मरणारच नाही किंवा जन्मालाच येणार नाही किंवा काहीही बदलू शकणार नाही. जग चंचल आहे आणि या सगळ्या गोष्टी होत राहणारच. तुम्ही तुमच्यासाठी एक कल्याणकारी कार्यप्रणाली लिहिल्यावर तुम्हाला जीवन आणि मृत्यूच्या प्रक्रियेतून सहज होऊन कसे जावे हे कळते, कारण तुम्ही स्वतःला आतून मजबूत बनवलेले असते. ज्याला आम्ही ‘इनर इंजिनिअरिंग असे म्हणतो, ती संपूर्ण ध्यान-योग क्रिया फक्त ही कर्म प्रणाली सजग होऊन लिहिण्यासाठीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com