
बौद्धिक आकलन म्हणते, ‘होय’. ते स्वीकार करते. अनुभवसिद्ध समज जाणीव घेते, पाहते, सर्व साहजिकच आहे. अस्तित्वाची जाणीव निर्विवाद आहे. तो तुमचा स्वभावच होतो. तुम्ही ऐकता ते अनुभवातून समजले नसल्यास ते फक्त एक शब्दांचा गुंता राहील. हे जास्त भावनिक स्तरावर असते. बौद्धिक स्तरावर तुम्हाला कळू शकेल की, तुम्ही पोकळ आणि रिक्त आहात; मात्र ‘तुम्ही पोकळ आणि रिक्त आहात’ या भावनेची जाणीव होणे, ही वेगळीच स्थिती आहे.
आपल्या आकलनाचे तीन प्रकार असतात. बौद्धिक आकलन, अनुभवसिद्ध आकलन आणि अस्तित्वातून होणारी जाणीव.
बौद्धिक आकलन म्हणते, ‘होय’. ते स्वीकार करते. अनुभवसिद्ध समज जाणीव घेते, पाहते, सर्व साहजिकच आहे. अस्तित्वाची जाणीव निर्विवाद आहे. तो तुमचा स्वभावच होतो. तुम्ही ऐकता ते अनुभवातून समजले नसल्यास ते फक्त एक शब्दांचा गुंता राहील. हे जास्त भावनिक स्तरावर असते. बौद्धिक स्तरावर तुम्हाला कळू शकेल की, तुम्ही पोकळ आणि रिक्त आहात; मात्र ‘तुम्ही पोकळ आणि रिक्त आहात’ या भावनेची जाणीव होणे, ही वेगळीच स्थिती आहे. एखाद्याला अनुभव येतो, तेव्हा त्याला त्याबद्दल आणखी जाणून घ्यावेसे वाटते आणि तो साधक बनतो. तुम्हाला फक्त बौद्धिक स्तरावर समज आली असल्यास तुम्हाला वाटेल की, तुम्हाला सर्व माहितीच आहे. बहुतेक धार्मिक नेते या वर्गात मोडतात. अनुभवातून आलेली समज आणि बौद्धिक समज या दोन्ही अस्तित्वाच्या जाणिवेत अंतर्भूत असतात. परंतु अस्तित्वाची जाणीव या दोहोंच्या पलीकडे असते. तिथे कसे पोचावे? असा काही विशिष्ट मार्ग नाही. फळ पिकून तयार होते, तेव्हा ते सहज गळून पडते.
ज्ञानप्राप्ती पलीकडे
तुमचे खूप चेहरे आहेत, पण तुम्ही त्यांना सामोरे जात नाही. तुम्ही तुमच्या चेहऱ्यांना सामोरे येता, तेव्हा तुमच्यामध्ये संघर्ष, गैरव्यवहार आणि गोंधळ निर्माण होतो. वेळोवेळी, वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळे चेहरे समोर येतात. तुम्ही स्वत्वाच्या जवळ आल्यावर सगळे चेहरे गळून पडतात आणि उरते ते फक्त अवकाश. तुम्ही स्थूलमानाने आता कुणीतरी आहात, तशाप्रकारे तुम्ही स्वतःला ओळखता. तुम्ही सूक्ष्म पातळीवर जाता, तसतसे तुम्ही स्वतःला ऊर्जेचा स्रोत, देवदूत किंवा संत अथवा प्रेषिताचा अवतार म्हणून ओळखू शकाल. तुम्ही या ओळखींच्याही पलीकडे जाल, तेव्हा तुम्ही सर्वव्यापी, पवित्र, पूर्णब्रम्ह व नारायण असाल.