
तुमचे भान अनुभवाकडून अनुभव घेणाऱ्याकडे वळवा. सगळे अनुभव परिघावर आहेत आणि ते बदलत असतात. अनुभव घेणारा, जो बदलत नाही, तो वर्तुळाच्या केंद्रस्थानी आहे. तुम्ही पुन:पुन्हा अनुभव घेणाऱ्याकडे परत या. तुम्ही निराश झाला असल्यास निराशेच्या अनुभवात वेळ न दवडता विचार करा, ‘कोण निराश आहे?’ तुम्ही आनंदी नसाल तर विचारा, कोण आनंदी नाही?
तुमचे भान अनुभवाकडून अनुभव घेणाऱ्याकडे वळवा. सगळे अनुभव परिघावर आहेत आणि ते बदलत असतात. अनुभव घेणारा, जो बदलत नाही, तो वर्तुळाच्या केंद्रस्थानी आहे. तुम्ही पुन:पुन्हा अनुभव घेणाऱ्याकडे परत या. तुम्ही निराश झाला असल्यास निराशेच्या अनुभवात वेळ न दवडता विचार करा, ‘कोण निराश आहे?’ तुम्ही आनंदी नसाल तर विचारा, कोण आनंदी नाही? तुम्हाला वाटत असेल, की तुम्हाला माहिती आहे, तर ‘कुणाला माहिती आहे?’ असा विचार करा. तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला आहे, तर विचारा, ‘असा कोण आहे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे?’
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तुम्हाला तुम्ही अजाण आहात, असे वाटत असेल तर विचारा, ‘कोण अजाण आहे?’ तुम्हाला वाटत असेल, ‘मी बिचारा आहे’ तर विचारा ‘मी बिचारा का आहे?’ तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही परमभक्त आहात, तर विचारा ‘असा परमभक्त कोण आहे?’ तुमचे सगळे मुखवटे फेकून द्या आणि त्या ‘मी’ला तोंड द्या. तेव्हाच तुम्ही खरे माझ्याकडे आलात.
सुज्ञपणाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे
तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती कोणाची करता?
तुम्ही स्वतःची प्रार्थना करता! प्रार्थना करताना आपले मन त्याच्या स्वतःच्या मूळ स्रोताकडे, म्हणजे स्वतःकडे जाते. देव, गुरू आणि स्व, सगळे अखेरीस सारखेच आहेत.