चेतना तरंग : मनुष्यत्वाचे महत्व ओळखा!

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
Tuesday, 7 April 2020

आपल्या ग्रहमालिकेतील सर्व ग्रहांपेक्षा पृथ्वीला खास मान दिलाय, कारण तिने विविध प्रकारच्या जीवांना आश्रय दिला आहे. सर्व जीवमात्रांमध्ये मानव हा खास मानाचा आहे, कारण तो ज्ञानाला आश्रय देऊ शकतो. सर्व ज्ञानीजनांत तुम्ही खास मानाचे आहात - का ते ओळखा पाहू? ज्यांना आपलं वैशिष्ट्य, वेगळेपणा कळत नाही, ते नीच दर्जाचे आहेत. ते सर्व नकारात्मक गोष्टींना आश्रयदेखील देतात.

आपल्या ग्रहमालिकेतील सर्व ग्रहांपेक्षा पृथ्वीला खास मान दिलाय, कारण तिने विविध प्रकारच्या जीवांना आश्रय दिला आहे. सर्व जीवमात्रांमध्ये मानव हा खास मानाचा आहे, कारण तो ज्ञानाला आश्रय देऊ शकतो. सर्व ज्ञानीजनांत तुम्ही खास मानाचे आहात - का ते ओळखा पाहू? ज्यांना आपलं वैशिष्ट्य, वेगळेपणा कळत नाही, ते नीच दर्जाचे आहेत. ते सर्व नकारात्मक गोष्टींना आश्रयदेखील देतात. पुनःपुन्हा लक्षात ठेवा, तुम्हीच शांती आहात, तुम्हीच प्रेम आहात, तुम्हीच आनंद आहात आणि तुम्हीच आहात या विश्वकर्त्याचे आश्रयदाते. तुम्ही आश्रयदाते आहात याची जाण नसल्यास तुम्ही भुताप्रमाणे जगत आहात. पक्षी त्यांच्या घराकडं परततात, तसं वारंवार तुमच्या मूळ तत्त्वाकडं परत या. तिथंच तुम्हाला जाणीव होईल की, तुम्ही दिव्यत्वास आसरा दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनंताचे विविध गुण आहेत आणि विशेष गुणानुसार ते विविध नाम धारण करतात. त्यांना देव म्हणतात. देवता म्हणजे तुमच्याच परमात्म्याची किरणे, तुमचेच विस्तारित हात. तुम्ही जेव्हा एकाग्र होता, त्यावेळी ते तुमच्याच सेवेत राहतात. एका अंकुरलेल्या बीजातून मूळ, शाखा, पल्लवी फुटतात. त्याचप्रमाणं तुम्ही केंद्रित झाल्यावर तुमच्या आयुष्यात सर्व देवदेवतांचं प्रकटीकरण होतं. देवता तुमच्या संगतीत खूप आनंदित होतात. ते तुमची सेवा करण्यासाठी असतात.

सूर्याच्या उज्ज्वल प्रकाशात ज्याप्रमाणं सर्व रंग समाविष्ट होऊन राहतात, त्याचप्रमाणे सकल देवता तुमच्या विशुद्ध आत्म्यामध्ये सामावलेल्या असतात. परमसुख हा त्यांचा श्वास आहे, तर वैराग्य हे त्यांचे निवासस्थान आहे. वैराग्याचा दाता शिव आहे, शिव म्हणजे ती परमचेतना; जिच्यात निरागसता आहे, जी आनंदमय आहे, सर्वव्यापी आहे. शिवाची बाह्य अभिव्यक्ती म्हणजे कृष्ण आहे आणि कृष्णाचे आंतरिक मौन म्हणजे शिव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Sri Sri Ravi Shankar Recognize the importance of humanity