चेतना तरंग - भोवळ (व्हर्टिगो) आणि योगोपचार

sri-sri-ravi-shankar
sri-sri-ravi-shankar

पुणे  भोवळ येणे म्हणजे काय?
भोवळ किंवा व्हर्टिगो हे चक्कर येण्याचे लक्षण आहे. मेंदूच्या समतोल आणि स्थिरतेमध्ये बिघाड झाल्यामुळे तयार झालेल्या संवेदनेमुळे भोवळ येते, म्हणजेच व्हर्टिगोचा त्रास होतो. भोवळ येण्यामुळे कानाच्या आतील कॅल्शियमपासून किंवा द्रव पदार्थापासून बनलेल्या गती व हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या भागाला अपाय होतो. परंतु, ठराविक योगासनांचा अभ्यास केल्यामुळे स्थिरता आणि समतोल सुधारतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हर्टिगोची कारणे

  • व्हर्टिगो कानाच्या आतमध्ये पुरेसे रक्तप्रवाह न झाल्यामुळे उद्भवतो. 
  • कधीकधी साध्या थंडीतापाचे सामान्य विषाणूसुद्धा कानाच्या आतील मेंदूपर्यंत जोडलेल्या भागावर हल्ला करतात. त्यामुळे भोवळ येण्याची शक्यता. 
  • कवटीचे नुकसान झाल्यामुळेही मळमळ, श्रवणशक्तीची हानी होऊ शकते. 
  • विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा हवेमधील विनाशकारी कणांच्या (उदा. धूळ) ॲलर्जीमुळे देखील भोवळ येऊ शकते. 
  • मज्जासंस्थेशी निगडीत असलेल्या आजारामुळेंही समतोलावर परिणाम होऊन व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो.

व्हर्टिगोवरील आजारांवर योगासने फायदेशीर
निवडक योगासने मज्जासंस्था आणि कानामधील संतुलन साधणारी केंद्रे किंवा अवयव कार्यक्षम करण्यात मदत करतात. ती मज्जासंस्थेवरही थेट परिणाम करून डोके आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्ताभिसरण सुधारतात. मज्जासंस्थेला उत्तेजन देणारी आणि मेंदूकडे शुद्ध रक्त घेऊन जाणारी योगासने व्हर्टिगोसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
षण्मुखी मुद्रा : ही मुद्रा मेंदू आणि मज्जासंस्था यांना आराम देऊन चिंता, राग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याचप्रमाणे डोळे आणि चेहऱ्यावरील शिरांना आराम देऊन पुनरुज्जीवन करते.
नाडीशोधन प्राणायाम : रक्त आणि श्वसनप्रणालीला शुद्ध करतो. दीर्घश्वासामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळून श्वसनप्रणाली मजबूत होते. मज्जासंस्था संतुलित होते.
सालम्ब शीर्षासन : या आसनामुळे अवयवांवर गुरुत्वाकर्षणाच्या उलट वेगाच्या परिणामामुळे यकृत, मूत्रपिंड, पोट, आतडे आणि पुनरुत्पादक अवयवांच्या समस्यांवर मात करण्यास मदत होते. 
हलासन : मान, खांदे, अंगावरील आणि मागच्या स्नायूंना बळकट आणि खुले करते. मज्जासंस्था शांत करते. तणाव कमी करते आणि थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. रजोनिवृत्ती दरम्यान महिलांसाठी उपयुक्त. 
पश्चिमोत्तानासन : हे आसन तणावमुक्तीचे कार्य करते आणि चिंता, क्रोध आणि चिडचिडेपणा दूर करते. हे मासिक पाळीचे संतुलन राखते. 
शवासन : या आसनामुळे सखोल आणि ध्यानासारखी आरामदायी विश्रांती मिळते, जी पेशींच्या दुरुस्तीमध्ये आणि तणाव दूर करण्यास मदत करू शकते. ते रक्तदाब, चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास देखील मदत करते.

व्हर्टिगोपीडित व्यक्तींसाठीचे पथ्य 
सामान्यत: व्हर्टिगोपीडित व्यक्तींनी पुढे, खाली वाकून करण्याऱ्या क्रिया टाळाव्यात किंवा सावधानतेने कराव्यात. त्याचप्रमाणे हा आजार असणाऱ्या व्यक्तींनी योगासनांचा अभ्यास हळूहळू सुरू करावा. अंतिमतः, मेंदूच्या पेशींमध्ये निरोगी, शुद्ध रक्तप्रवाह जाणे हा व्हर्टिगो बरा होण्याच्या प्रक्रियेचा सार आहे. मज्जासंस्था उत्तेजित आणि मेंदूकडे जाणारे रक्त शुद्ध होते, असे व्यायाम किंवा आसनांचे प्रकार करणे हा सर्वांत उत्कृष्ट उपाय आहे.
अधिक वाचा https://www.artofliving.org

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com