

A powerful cancer journey, emotional support story, love and strength through illness
Sakal
अशा नेगी (लेखिका कॅन्सर जनजागृती साठी कार्यरत)
‘साक्षात्कारी’ कर्करोग
कर्करोग नाव जरी ऐकलं, तरी अंगावर शहारे येतात. हा आजार फक्त शरीराला नाही तर मनालादेखील थकवतो. उपचार, वेदना, अनिश्चितता... या सगळ्यांमध्ये रुग्ण कोसळूही शकतो; पण कधी कधी या काळोखातही प्रेमाची एक ज्योत अशी पेटते की रुग्णाला पुन्हा जगण्याची, लढण्याची आणि उभं राहण्याची ताकद मिळते. कर्करोगाचा प्रवास जितका कठीण, तितकाच नात्यांची खरी कसोटी घेणारा असतो.