esakal | Video : योगासने का करावीत?
sakal

बोलून बातमी शोधा

yoga

पूर्वी लोकांना ताण नव्हता का? नक्कीच होता. पण, आता तो सहन करून त्यातून मार्ग काढणं जास्त अवघड जातंय. अनेक जण ताणाचं उत्तर व्यसनात शोधू लागतात.

Video : योगासने का करावीत?

sakal_logo
By
देवयानी एम.

आपल्याला याचं महत्त्व खरंच पटलंय का? की सहज टाळू शकतो अशा अनावश्यक विकारांना आपण आमंत्रण देतोय? हे म्हणजे घरची विहीर असूनही दुकानातून पाणी विकत आणण्यासारखं आहे. तुम्हाला असे नाही का वाटत, की निरोगी शरीर व मन आपला हक्क किंवा मूलभूत गरज आहे. यामुळंच उच्च दर्जाची कार्यप्रणाली प्राप्त होऊ शकते. पण, हा हक्क फार काळ फुकट मिळत नाही आणि आपण त्याला गृहीतही धरू शकत नाही. काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्नाची गुणवत्ता, वातावरणातील भीषण बदल, प्रदूषण, कामाच्या पद्धती-दीर्घ प्रवास, स्पर्धा, अनिश्चितता, एकंदरीत ताण. पण, काळ आणि तंत्रज्ञान कितीही बदलले तरी निरोगी राहण्याची मूलभूत तत्त्वं तीच राहणार आहेत. किंबहुना त्यांना अधिक गांभीर्यानं अंगीकारावं लागेल. पूर्वी लोकांना ताण नव्हता का? नक्कीच होता. पण, आता तो सहन करून त्यातून मार्ग काढणं जास्त अवघड जातंय. अनेक जण ताणाचं उत्तर व्यसनात शोधू लागतात. शरीराची ५०-६० या वयात होणारी झीज आता तिशी-चाळिशीमध्ये होतेय. ही अनैसर्गिक झीज का होतीये? 

याची कारणं 
1. बिघडलेली जीवनशैली 
2. कामाच्या वेळा व अंतर

पंचविशीतली उमेद आणि ऊर्जा पस्तिशीनंतर कमी होते. कारण, हा थकवा साठत जातो. थकलेला मेंदू आणि अंतर्गत इंद्रियांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. सकाळी उठल्यावर आपल्याला हलकं, ताजं आणि सकारात्मक वाटायला हवं, पण या ‘बर्नआउट’मुळं पूर्ण रात्र झोपूनही सकाळी फ्रेश वाटत नाही. परंतु, कामासाठी उठावंच लागतं. आपला दिवस थकव्यानं सुरू होतो. कार्यक्षमता कमी होते आणि अनेकदा आपण दिवस ढकलतो. अशी अनेक वर्षे ओढली, की आपली इंद्रियं आणखी थकतात.

योगाची भूमिका
आता यातून मार्ग कसा काढायचा? इथे ‘योग’ महत्त्वाची भूमिका साकारतो. रोज या थकव्याचा निचरा करता आला, म्हणजे आपल्या मेंदू आणि आंतरिक यंत्रणेला पूर्ण आराम देऊ शकलो, तर आपण नक्कीच निरोगी राहू शकतो. दिनचर्या अशी नियमित करा, की शिथिलीकरण हेच थकवा आणि विकारांवर औषध असेल. आनंदी राहण्यासाठी ‘less is more’ हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, याबद्दल आपण पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलू. खालील उपाय सुरू करा.

1. दिवसातून २०-३० मिनिटं योग निद्रेसारखी सखोल विश्रांती.
2. आठवड्यातून किमान तीन वेळा आसन, प्राणायाम, ध्यानाचा तज्ज्ञांच्या  मार्गदर्शनाखाली तासभर सराव.
3. झोपेचे घड्याळ सांभाळणं.

चाळिशीतील आजार 
मधुमेह, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन, थायरॉईड, ॲलर्जी, अंगदुखी, मायग्रेन आदी. हे सर्व आजार आपण औषधांनी बरे करू पाहतो. पण, पूर्ण बरे वाटत नाही; कारण मूळ स्रोत वेगळाच असतो. मानसिक तणाव आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळं आलेले हे विकार आणखी क्लिष्ट होत जातात. स्ट्रेस हार्मोन आपल्या आजाराला अनियंत्रित अवस्थेमध्ये नेतात. आपण औषधांचे आश्रित होऊन बसतो.

loading image