

How Wrong Posture Damages Your Spine
Sakal
डॉ. अजय कोठारी (कन्सल्टंट स्पाइन सर्जन)
अस्थिबोध
आजचं कामाचं जग बदललं आहे - क्युबिकल्स, लॅपटॉप, सततच्या मीटिंग्ज आणि स्क्रीनसमोरचे तास. बाहेरून पाहिलं तर सर्व काही परफेक्ट दिसतं; पण शरीर शांतपणे इशारे देत असतं. सकाळी उठताना मान जड वाटणं, कंबर ताणलेली भासणं, ऑफिसनंतर थकवा - ही चुकीच्या पोस्चरची पहिली चाहूल असते. अनेकांना वाटतं, ‘बसणं म्हणजे आराम’; पण स्पाइनच्या दृष्टीने ते नेहमीच खरं नसतं. योग्य पद्धतीने न बसल्यास कण्यावर दर मिनिटाला अनावश्यक दाब निर्माण होतो. ही वेदनांची कहाणी सुरुवातीला ‘सायलेंट’ असली, तरी नंतर मात्र ती त्रासदायक बनू शकते.