Video : पौगंडावस्थेसाठी सुपरफूड

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 25 February 2020

पौगंडावस्था आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. बालपण आणि प्रौढावस्थेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.

लाइफस्टाइल कोच 
डॉ. मनीषा बंदिष्टी
पौगंडावस्था आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. बालपण आणि प्रौढावस्थेला जोडणारा महत्त्वाचा दुवा. त्यामुळे किशोरवयात आरोग्य, आहारातील गुंतवणूक अतिशय महत्त्वाची असते. हेल्दी जीवनशैलीसाठी हेल्दी आहारही महत्त्वाचा आहे. किशोरवयातच मुलांना पौष्टिक आहाराबाबत शिकवावे. त्यामुळे मुलांचे भविष्यातील समस्यांपासून रक्षण होईल. 

वयाच्या या टप्प्यावर काय महत्त्वाचे?
शरीर-सौष्ठत्वासाठीचे पदार्थ (प्रथिने)
 स्नायू आणि ऊतींची वाढ आणि दुरुस्तीसाठी गरजेचे असतात.
 संप्रेरके आणि एन्झाईम्सच्या निर्मितीसाठीही आवश्यक.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संरक्षणात्मक खाद्यपदार्थ 
(जीवन-सत्वे आणि खजिने)
जीवनसत्वे : हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. जखमा भरून येण्यास मदत करतात. दृष्टी सुधारते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक.
कॅल्शियम : मजबूत हाडांच्या     निर्मितीत मदत करते. संप्रेरकांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतूच्या कार्यासाठीही उपयुक्त.
लोह : रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीत मदत करते. (शरीरातील ऊतींपर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन महत्त्वा‍चे असते.)  

ऊर्जा देणारे पदार्थ (कर्बोदके आणि फॅट्स)
 कर्बोदके ऊर्जा पुरवतात.
 दैनंदिन क्रिया पार पडण्यासाठी.
 मेंदू आणि स्नायूंच्या क्रियाशीलतेसाठी.

फॅट्स यासाठी आवश्यक असतात.
 चरबीमध्ये (फॅट्स) विरघळणाऱ्या अ, ड, ई आणि क जीवनसत्त्वांच्या शोषणासाठी
 संप्रेरके निर्माण करण्यासाठी
 मज्जासंस्थेचे रक्षण करण्यासाठी

पाणी
 शरीराचे तापमान नियंत्रित करते.
 पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक पोचवते.

वाढत्या वयातील  मुलांसाठी सुपरफूड 
(दैनंदिन आहारात  समावेश करण्याचा प्रयत्न करा.)
पंचरत्न भाकरी : बाजरी + ज्वारी + नाचणी + राजगिरा + शिंगाडा पीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. manisha bandishti article superfood