Video : तणाव नियोजनाचा ‘आहार’मार्ग...

manisha bandishti article about Diet to stress planning
manisha bandishti article about Diet to stress planning

लाइफस्टाइल कोच :
आपल्याला अनेकवेळा आयुष्यात ताणतणावांचा सामना करावा लागतो. त्यांचे व्यवस्थित नियोजन न केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. ताणाशी यशस्वी सामना करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे, जीवनशैलीतील बदल. ध्यान, श्वसनाच्या व इतर व्यायामांबरोबरच आपण खाण्यापिण्याच्या सवयी बदलूनही ताणतणावांना तोंड देऊ शकतो. 

ताण आणि विचारहीन खाण्याचे (Mindless Eating) दुष्टचक्र बनते.
आहाराच्या आरोग्यदायी सवयी ताणापासून मुक्तता करू शकत नाहीत. मात्र, त्यांची ताणाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देण्यात मदत होते.

ताणतणाव नियोजनासाठी आहाराच्या सवयी
 नियमित, पुरेसे पाणी पिऊन 
शरीराचे सजलीकरण करावे.
 वेळेवर खाऊन जैविक घड्याळ सांभाळावे.
 आहारात तणाव आणि चिंता कमी करणाऱ्या महत्त्वाच्या पोषक घटकांचा समावेश करावा.
 कर्बोदके, ‘क’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असलेले पदार्थ, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, ‘ब’ जीवनसत्त्व व विशेषतः ब ६, ब १२, कॅल्शिअम, ओमेगा ३ आदी.


तणावादरम्यान आहाराचे निकृष्ट पर्याय
जेवण टाळणे
पुरसे पाणी न पिणे
फारसा विचार न करता चिप्स, सामोशासारखे पदार्थ खाणे.
फास्ट फूडला प्राधान्य देणे
चहा-कॉफीचे अतिरिक्त सेवन
गोड पदार्थ खाणे

वरील सर्व गोष्टींमुळे केवळ ताणच वाढत नाही, तर लठ्ठपणासह अन्य जीवनशैलीजन्य आजारांनाही आमंत्रण मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com