Fashion Tips : हिवाळ्यात स्वेटर फॅन्सी लूक करता येत नाही ; हा आहे बेस्ट ऑप्शन!

स्वेटरच नव्हे तर अनेक स्टायलिश लुक देणारे कपडे बाजारात आले आहेत.
Winter fashion
Winter fashionEsakal

लवकरच नवीन वर्ष 2023 सुरू होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याची आपली मानसिकता होत आहे. एक नवीन तारीख, महिना आणि वर्ष तुमच्या स्वागताला सज्ज आहे. प्रत्येकाला येणाऱ्या वर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करायचे आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक ट्रीप प्लॅन करतात. अनेकजण नवीन वर्षाला खास पार्टीचे नियोजन करतात. तर काहीजण कुटुंबासोबत वेळ घालवतात. New Year 2023 Travel Outfits Ideas

यंदाच्या नव्या वर्षाला तूम्ही ट्रीपला जाण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी तूमच्या कामाची आहे. कारण, थंडीचा कडाका सहन करण्यासाठी हिवाळ्याचे उबदार कपडेही सोबत नेत असाल तर थांबा आधी हे वाचा. ट्रिपला गेल्यावर फॅन्सी जीन्सवर, शॉर्टवर स्वेटर घालून फोटो काढले जातात. थंडीच जास्त असल्याने स्वेटर काढणे शक्यही नसते. तसा विचारही कोणी करू शकत नाही. अशावेळी काय करायचं ते सुचत नाही.

सध्या हिवाळ्यातील फॅशन म्हणून केवळ स्वेटरच नव्हे तर अनेक स्टायलिश लुक देणारे कपडे बाजारात आले आहेत. त्यामध्ये स्वेट शॉर्ट, स्वेट शर्ट, स्वेट कूर्ता , स्वेट जॅकेट असे बरेच ऑप्शन आहेत. हे एवढे ऑप्शन असताना प्रवासात त्रासदायक वाटणारे स्वेटर प्रवासात नेऊ नका.

हिवाळ्याला सुरूवात झाल्याने तो अधिकच वाढण्याची शक्यता आहे. थंडीत व्हायरल आणि सर्दीचा त्रास नक्की जाणवतो. अशावेळी ट्रिपला जात असाल तर असे कपडे निवडा जेणेकरुन ते तुमचा थंडीपासून बचाव करू शकतील आणि दिसायला स्टायलिशही असतील. प्रवासादरम्यान आरामदायीपणा लक्षात घेऊन जीन्स सामानात नक्कीच ठेवा. जीन्स कोणत्याही प्रकारच्या टॉप, स्वेटर, जॅकेट किंवा कोटवर घालता येते.

प्रवासात लोकरी टोपी आणि मफलर किंवा शाल इत्यादी ठेवा. हिना खान या प्रकारच्या वूलन कॅपमध्ये खूपच स्टायलिश आणि क्यूट दिसत आहे. तूम्हीही असाच लुक करा आणि स्टायलिश फोटो काढून मैत्रीणींना जेलस फिल करा.

तुम्ही हिल स्टेशनवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर बूट किंवा शूज सोबत घ्या. नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टीमध्ये हील्स चांगली दिसतात. पण हिवाळ्यात बूटांसोबत स्टायलिश लुक पाहायला मिळेल. यासोबत सॉक्स किंवा स्टॉकिंग्ज तुमच्या सामानासोबत पॅक करा.

Hina Khan
Hina Khan Esakal

तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये लोकरीचे स्वेट जॅकेट ठेवू शकता. स्वेट जॅकेट जीन्स, स्कर्ट, पॅंटवर सहज घालता येते. थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी पुल ओव्हर्स, बेस्ट क्वालिटी लोकरीचे स्वेटर किंवा कार्डिगन्सचा ऑप्शन आहे.

तूम्ही एखाद्या तिर्थस्थानावर जात असाल तर वूलन कूर्ती घालू शकता. सध्या बाजारात 500 रूपयात 2 कूर्ती आरामात मिळतात. त्यामूळे तो ऑप्शन बेस्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com