चालाल तर चालाल !

Health Article Walk For Good Health
Health Article Walk For Good Health

दररोज ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणे सर्वाधिक लाभदायी आहे. एकाच वेळी ३० मिनिटे देऊ शकत नसाल तर तीन सत्रांत दहा-दहा मिनिटे चाललात तरीही ते उपयुक्त ठरते. मित्र, सहकारी किंवा शेजाऱ्यांसोबत चालण्याचा व्यायाम केला तर तुम्हाला आरोग्याबरोबरच आनंदाचे क्षणही मिळतील, ते वेगळेच. कुठलाही व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्‍टरांचा सल्ला घेणे, केव्हाही हितवर्धकच. विशेषतः तुम्ही वयाची चाळीशी ओलांडली असेल, तुमचे वजन वाजवीपेक्षा खूप अधिक असेल किंवा तुम्ही खूप वर्षांनी व्यायामाकडे वळला असाल तर ते अनिवार्य ठरते.

चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य उत्तम चालते, हाडे मजबूत होतात, शरीरातील अनावश्‍यक चरबी कमी होते, स्नायूंची ताकद आणि सहनशक्तीही वाढते. त्याचवेळी हृदयविकार, मधुमेह, हाडांची ठिसुळता, काही प्रकारचे कर्करोग अशा विकसित होणाऱ्या आजारांपासून तुमचे शरीर दूर राहते. चालण्याइतका सहज सोपा व्यायाम नाही. विशेष प्रशिक्षण किंवा उपकरणांची गरज नाही. कुठल्याही प्रकारचे धोके नाहीत. २००७ मध्ये झालेल्या एका पाहणीत आढळून आले आहे की, आठवड्यातून फक्त ७५ मिनिटे (म्हणजे दर दिवशी सरासरी १० मिनिटे) चालणाऱ्या महिलांची प्रकृती कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणाऱ्या महिलांपेक्षा अधिक पटीने चांगली असते. 

चालताना काय घडते, तर तुम्ही तुमच्या शरीराचे वजन वाहून नेत असता. त्यालाच वजन सहन करणारा व्यायाम असे म्हटले जाते. यातून तुमच्या शरीरास अधिक फायदे मिळण्यासाठी तुम्ही किमान ३० मिनिटे तरी चालले पाहिजे. त्यातील पहिली दहा मिनिटे सर्वसाधारण, त्यानंतरची दहा मिनिटे अधिक जलद, शेवटची दहा मिनिटे सर्वसाधारण गती अशी विभागणी असली पाहिजे.

हे लक्षात ठेवा

  •  रोज चालण्यापूर्वी विशिष्ट अंतर ठरवून घ्या.
  •  दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा थोडे अधिक चालण्याचा प्रयत्न करा.
  •  किमान पाच हजार पावले चालणे प्रकृतीसाठी फायदेशीर.
  •  आठवड्यातून एकदा टेकडीवर चालत जा. 
  •  एक दिवस ठरविलेले अंतर झपझप चालत जा. येताना नित्याचा वेग ठेवा.
  •  कधीतरी वजन घेऊन चालण्याचा प्रयत्न करा. त्याने स्नायूंची शक्ती सुधारते.
  •  चालण्यापूर्वी आणि नंतर किमान ३० सेकंद तरी स्ट्रेचिंग जरूर करा. त्यामुळे स्नायू आखडत नाहीत.
  •  ऋतुनुसार कपडे परिधान करा.सर्वसाधारण कपडेअधिक उपयुक्त. 
  •  पायात आवर्जून शूज घाला. ते तुमच्या सवयीचे व योग्य असतील हे पाहा.
  •  चालण्याचा परिसर दर आठवड्याला बदला.
  •  रोज तुम्ही किती पावले चालला याची नोंद ठेवा. 
  •  फिरायला जाताना सोबत कोणी तरी नक्की घ्या. तुमच्या पाळीव कुत्र्याबरोबर जा.
  •  इतरांसोबत चालण्याने सामाजिक जीवनाचा नवा दृष्टिकोन लाभू शकतो.
  •  तुम्हाला चालणे न जमल्यास लिफ्टचा वापर टाळा. त्याऐवजी जिन्याचा उपयोग करा.
  •  एरव्ही गाडी वापरण्यापेक्षा छोटी-छोटी कामे चालत जाऊन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com