हेल्दी फूड; मधुमेह आणि जीआय फूड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

myfa

हेल्दी फूड; मधुमेह आणि जीआय फूड

आपल्या देशात ७ कोटी ७० लाख मधुमेहाचे रुग्ण आहेत. चीननंतर भारतात सर्वाधिक मधुमेहींची संख्या आहे. हा आजार औद्योगिकीकरण, लोकांचे शहरी भागांत झालेले स्थलांतर, बैठी जीवनशैली आणि पर्यावरणातील बदलांमुळे बळावतो आहे. इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशन (आयडीएफ) देशातील मधुमेहींचा आकडा २०४५पर्यंत १३ कोटी ४० लाखांपर्यांत जाण्याची भीती आहे. त्यामुळे भारत डायबेटिक फूडची वाढती बाजारपेठ म्हणून पुढे येणार आहे.

डायबेटिसची बाजारपेठ वाढण्याची कारणे

  1. बैठी जीवनशैली

  2. ग्राहकांची वाढती जागृती

  3. वृद्धांची वाढती संख्या

  4. लोकांचे वाढते उत्पन्न

  5. सुपरमार्केटचे वाढते प्रस्थ

  6. इ-कॉमर्स इंडस्ट्रीची भरभराट

डायबेटिक फूडच्या उत्पादक कंपन्या नवनवीन उत्पादने बाजारात आणत विविध क्षेत्रांत प्रवेश करीत आहेत. यामध्ये लो-कॅलरी साखर, तळलेल्या पदार्थांऐवजी खास भाजलेले पदार्थ, डाएट शीतपेये, कमी फॅट असलेली डेअरी उत्पादने, डाएट नाश्‍त्याचे पदार्थ आणि मिठाई. या पदार्थांमुळे डायबेटिक फूड इंडस्ट्रीसाठी नवनवी दालने खुली होत आहेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) उत्पादने हा त्यांपैकीच एक ट्रेंड आहे. यामध्ये शरीर अन्नपदार्थांचे पचन कशाप्रकारे करते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढण्यावर कसा परिणाम होतो, हे मोजले जाते. ५५पेक्षा कमी जीआय असलेल्या अन्नपदार्थांमध्ये अशा प्रकारचे कार्बोहायड्रेड्स असतात, ज्यांचे विघटन करण्यास शरीराला अधिक वेळ लागतो. कमी जीआय असलेले साखर आणि तांदळासारखे अनेक अन्नपदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. तुमचे शरीर अमूल्य आहे, जिभेच्या चोचल्यांच्या मागे लागत तब्येत बिघडवून घेऊ नका.

loading image
go to top