इनर इंजिनिअरिंग  : महाशिवरात्रीचे महत्त्व...

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन
Tuesday, 25 February 2020

प्रत्येक महिन्याच्या १४ व्या दिवसाला किंवा अमावास्येच्या अगोदरच्या रात्रीला शिवरात्र म्हणतात. वर्षातील १२ शिवरात्रींपैकी फेब्रुवारी-मार्चमध्ये येणारी शिवरात्र आध्यात्मिकदृष्ट्या अगदी महत्त्वाची आहे.

भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षाचे सर्व ३६५ दिवस सण साजरे केले जात असत. वर्षाचा प्रत्येक दिवस साजरा करायला केवळ एक कारण हवे होते. हे सर्व दिवस आयुष्याच्या वेगवेगळ्या हेतू आणि कारणांना समर्पित होते. त्या काळी ऐतिहासिक घटना, युद्धातील विजय किंवा पेरणी, कापणी, मळणी अशा प्रत्येक प्रसंगानुरूप सण ठरवलेला असे, मात्र नुकत्याच साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीचे महत्त्व या सर्वाहून वेगळेच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक महिन्याच्या १४ व्या दिवसाला किंवा अमावास्येच्या अगोदरच्या रात्रीला शिवरात्र म्हणतात. वर्षातील १२ शिवरात्रींपैकी फेब्रुवारी-मार्चमध्ये येणारी शिवरात्र आध्यात्मिकदृष्ट्या अगदी महत्त्वाची आहे. या रात्रीत पृथ्वीचा उत्तर गोलार्ध नैसर्गिकरीत्या मानवी शरीरात ऊर्जेचा ऊर्ध्व दिशेने संचार होऊ लागतो. सृष्टी तुम्हाला आध्यात्मिक शिखराच्या दिशेने ढकलते. या निसर्गनिर्मित संधीचा लाभ घेण्यासाठी भारतीय संस्कृतीत आपण हा रात्रभराचा उत्सव ठरवलाय. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे – नैसर्गिकरीत्या ऊर्ध्व दिशेने होणारा शरीरातील ऊर्जेचा संचार अबाधित राखण्याच्या उद्देशाने तुम्ही तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही जागे असले पाहिजे, मुळीच झोपू नये. आध्यात्मिक मार्गावरील व्यक्तींना महाशिवरात्री अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच गृहस्थ जीवनातील आणि महत्त्वाकांक्षी लोकांनासुद्धा ती तितकीच महत्त्वाची आहे. गृहस्थ जीवनातील लोक महाशिवरात्रीला शिवविवाहाचा वार्षिकोत्सव म्हणून साजरा करतात, तर महत्त्वाकांक्षी लोक हा दिवस शिवांनी आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळविल्याचा विजय दिन म्हणून साजरा करतात. पण योगी, तपस्वींसाठी हा दिवस म्हणजे शिवकैलास पर्वताशी एकरूप झालेला दिवस होय. ते एका पर्वताप्रमाणे झाले – अगदी निश्चल आणि स्तब्ध. योग परंपरेत शिवांना देव म्हणून पूजत नाहीत. त्यांना आदिगुरू, म्हणजे सर्वांत पहिले गुरू ज्यांना ज्ञानोदय झाला ते. हजारो वर्षांच्या ध्यान साधनेने शेवटी ते निश्चलतेत स्तब्ध झाले. योगी, तपस्वी महाशिवरात्रीला स्तब्धतेची रात्र म्हणून पाहतात. 

योग परंपरेत हा दिवस आणि रात्र इतकी महत्त्वाची आहे याचे मुख्य कारण म्हणजे हा पर्व आध्यात्मिक जिज्ञासूंना पुष्कळ संभावना प्रस्तुत करतो. आजच्या आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलेय, की जीवन म्हणून काही तुम्ही जाणता, तुम्ही अस्तित्व आणि त्यातील तत्त्वांबद्दल काही जाणता, काही तुम्हाला ब्रह्मांड आणि तारकापुंज म्हणून ज्ञात आहे, हे सर्व केवळ एकच ऊर्जा लाखो प्रकारे व्यक्त होतेय. शिवरात्र म्हणजे महिन्याची अगदी काळोखी रात्र. प्रत्येक महिन्यात शिवरात्र साजरी करणे; विशेष करून महाशिवरात्र म्हणजे जणू अंधाराचा सण साजरा करण्यासारखे आहे. ‘शिव’चा शब्दशः अर्थ आहे ‘ते जे नाही’. ‘ते जे नाही’ याचा अर्थ तुम्ही डोळे उघडून नजर टाकल्यास भरपूर सृष्टी तुमच्या नजरेस पडेल. शिवरात्र तुमच्या संकुचित परिसीमा पुसून टाकण्यासाठी आणि विशाल सृष्टीच्या उगमाची अपारता अनुभवण्याची संधी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Importance of Mahashivratri