इनर इंजिनिअरिंग; तुमच्या वेळेचे सरव्यस्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग; तुमच्या वेळेचे सरव्यस्थापन

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाऊंडेशन

सामान्यतः, माणसांमधील ऐंशी ते नव्वद टक्क्यांहूनही अधिक मानसिक क्रिया ह्या अनावश्यक असतात. ह्या सर्व अनावश्यक क्रिया जर त्यांनी क्रिया सोडून दिल्या, तर जरी ते दिवसाचे चोवीस तास कार्यरत राहिले, तरी त्यांना फारसे काही केल्यासारखे वाटणार नाही. जर मी दिवसाचे चोवीस तास काम केले, तर मी शारीरिकदृष्ट्या थकून जाईन. पण मानसिकदृष्ट्या, मी कधीही थकणार नाही किंवा तणावग्रस्त होणार नाही, कारण मला जे हवंय तेवढाच मी विचार करतो. जे मला नको त्याचा मुळीच विचार करत नाही.

त्यामुळे मला तणावाचा प्रश्नच येत नाही. बहुतेक लोकांसाठी, मन आणि शरीर यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे, ते नेहमीच कामाने थकून-भागून जातात. त्यांच्या डोक्यात अनावश्यक मानसिक विचारांची क्रिया चालूच असते. याबाबत त्यांनी जर काही केले नाही, तर त्यांना नेहमीच वेळेची कमतरता जाणवते. ते त्यांच्यातल्या संपूर्ण क्षमता-कौशल्याचा ठाव न घेताच त्यांचे आयुष्य त्यांच्या डोळ्यासमोरून निघून जात आहे.

आयुष्यात तुम्ही जे करू शकत नाही ते केले नाही, तर काहीच हरकत नाही. परंतु तुम्ही जे करू शकता ते जर केले नाही, तर तुमचे जीवन एक शोकांतिका आहे. प्रत्येक माणसाने हे टाळले पाहिजे. तो जे करू शकतो, ते घडलेच पाहिजे. आणि ते घडून यायचे असल्यास त्याचे मन आणि शरीर त्यांच्या संपूर्ण क्षमतेनीशी कार्य केले पाहिजे. तसे व्हायचे असल्यास त्याला याबद्दल काही तरी करावे लागेल. तुम्हाला भरपूर कार्य करायचे आहे म्हणून तुम्हाला ते करता येणार नाही. केवळ तुम्ही तुमचे कार्य कौशल्य आणि क्षमता वृद्धिंगत कराल, तेव्हाच तुम्ही अधिक काही करू शकता. तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा सध्या किती सुसंगत आणि तालात आहेत, तेवढेच तुम्ही करू शकता.

मनुष्याने त्याच्या अंतरंगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जे सध्या केले जात नाही. आम्ही योगायोगाने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या वाहनांची, मशिन्सची देखभाल करण्यासाठी खूपसारी काळजी घेतो. तुमची कार आणि मोटरसायकल तुम्ही सर्व्हिसिंगसाठी पाठवता, पण तुम्ही तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी काहीही केलेले नाही. जर एखाद्याला त्याच्या संपूर्ण क्षमतेनीशी कार्य करायचे असेल, तर त्याला याची खात्री करावी लागेल की त्याच्यात कोणत्याही आंतरिक समस्या नाहीत.

मी गोष्टींना टाइम मॅनेजमेंट अर्थात वेळेचे व्यवस्थापन म्हणून पाहत नाही. तर हे मुख्यतः ज्या कृती तुम्हाला करणे गरजेचे आहे, त्यानुसार वेगवेगळ्या कृतींसाठी वेळेचे वाटप करणे. हे करण्याचा कोणताही विशिष्ट मार्ग नाही, कारण प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे प्राधान्य असते. तुमच्यात प्राधान्य काय आहे हे स्पष्ट असेल, तर स्वाभाविकपणे वेळचे नियोजन अपोआप होईल. वेळेचे व्यवस्थापन करण्याऐवजी, जर जीवनातील एक विशिष्ट पैलू किती महत्त्वाचा आहे, हे जर तुम्हाला स्पष्टपणे समजले असेल, तर वेळ अपोआप आपले नियोजन करेल. तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या सभोवताली कोणती सर्वांत महत्त्वाची गोष्ट घडून येणे गरजेचे आहे हे जर तुम्ही जाणले, तर मग काय केले पाहिजे याबद्दल कोणताच गोंधळ असणार नाही.

loading image
go to top