हसण्यासाठी जगा :आनंदाचा मोदक, दु:खाचं विसर्जन!

‘आनंदात जगणं’ हे प्रत्येकालाच हवं असतं. मन प्रफुल्लित ठेवणारे क्षण आजूबाजूला घडले, की हे आपसूकच घडतं.  या घटना कळत-नकळत होत असतात.
Laughing
LaughingSakal

‘आनंदात जगणं’ हे प्रत्येकालाच हवं असतं. मन प्रफुल्लित ठेवणारे क्षण आजूबाजूला घडले, की हे आपसूकच घडतं.  या घटना कळत-नकळत होत असतात. अनपेक्षितपणे एखादी आनंददायी गोष्ट घडली, तर मन प्रसन्न होतं. तुमच्या आमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना डोळसपणे पाहिल्यास त्या आपल्याला खूप काही शिकवतात. ‘समोरच्या व्यक्तीला अनपेक्षित असणारे आनंदाचे क्षण, आपल्याला निर्माण करता येऊ शकतात का?’ याचा विचार प्रत्येकाने जरूर करावा. यातूनच समाजात सकारात्मकता निर्माण होत असते.

1) बाजारपेठेचा रस्ता गर्दीचा असतो.  नवरा-बायको तिथे कार घेऊन साडी खरेदीसाठी जातात.  प्रचंड पाऊस... त्यात गाडी लावायला जागा नाही. नवरा बायकोला म्हणतो, ‘‘तू इथंच उतर. मी गाडी लावून येतो.’’ त्या पावसात बायको खाली उतरते.  समोरचा दुकानदार हे सगळं पाहात असतो. तो आपल्या ‘दरवानाला’ एक छत्री घेऊन पाठवतो. ती महिला न भिजता दुकानापाशी येते. छत्री बंद करून देते. ‘अनोळखी’ दुकानदारानं न मागता केलेल्या या मदतीमुळं तिला आनंद होतो.  दुसऱ्या दुकानात जाण्याचा निर्णय रद्द  करून, ती त्याच दुकानात खरेदीला जाते.

2)‘पंचाहत्तरी’चा कार्यक्रम निवडक लोकांत, घरगुती स्वरूपात करण्याचा निर्णय होतो.  जेवणासाठी ऑर्डर दिली जाते.  प्रत्येक  डब्यावर पदार्थाचं नाव लिहून डबे घरी येतात.  काहीही न लिहिलेला एक मोठा डबा त्यात असतो.  उघडल्यानंतर त्यात साजूक तुपातल्या जिलब्या दिसतात.  ऑर्डर न देता आलेला हा जास्तीचा डबा यजमानांना लक्षात येतो.  ते डबे देणाऱ्या ‘केटरर’ला फोन करतात. पलीकडून ‘केटरर’ सांगतो, ‘‘तुमच्या पंचाहत्तरी निमित्त आमच्यातर्फे ही छोटीशी भेट आहे.’’ अनपेक्षितपणे आनंद देणारी ही कृती यजमान घरातल्या सगळ्यांना सांगतात. पुढील काळात सर्व समारंभाच्या ऑर्डर त्याच ‘केटरर’कडे जातात.

3) लग्नासाठी मुलाला शेरवानी घेण्यात येते. बिल देत असताना दुकानदार एक मोठा पुष्पगुच्छ मुलाला देऊन, अभिनंदन करताना म्हणतो, ‘‘शाळेच्या गणवेशापासून लग्नाच्या वेशापर्यंत तुम्ही आमच्याकडे खरेदी करत आहात.  आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा!’’ दुकानदारानं अचानक केलेला हा सत्कार सर्व कुटुंबाला आनंद देतो.  अर्थात, पुढच्या पिढीचेदेखील शाळेचे ड्रेस मग तिथूनच खरेदी होतात!

4) खूप वर्षांनी दोन मित्र अचानक हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा झाल्यानंतर एक जण ऑफिसच्या सहकाऱ्यांबरोबर  बसतो, तर दुसरा एकटाच टेबलवर बसतो. जेवण झाल्यावर एकटा  बसलेला मित्र बिल मागवतो.  वेटर सांगतो, ‘‘तुमचं बिल भरलेलं आहे.  ज्यांनी भरले आहे, त्यांनी तुमच्यासाठी चिट्ठी दिली आहे.’’ चिठ्ठीत लिहिलं असतं, ‘कॉलेजमध्ये असताना आपण एकमेकांना सोडून कधी जेवलो नव्हतो. आज  खूप दिवसानंतर भेटलो, पण दोन टेबलांवर होतो. म्हणून किमान बिल तरी एक करण्याचा प्रयत्न केला! लवकरच भेटू या!’ चिठ्ठी बंद करताना मित्राच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com