esakal | प्रतिकारशक्तीचा दुसरा स्तंभ : ताणतणाव नियोजन 
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकारशक्तीचा दुसरा स्तंभ : ताणतणाव नियोजन 

आपण तणावात असताना ‘कॉर्टिसोल’ हे स्ट्रेस हार्मोन स्रवते.ते आपल्या प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम करते. त्यामुळेच एखादी व्यक्ती तणावाखाली असल्यास तिला नेहमीच संसर्ग होतो.

प्रतिकारशक्तीचा दुसरा स्तंभ : ताणतणाव नियोजन 

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

आपण प्रतिकारशक्तीच्या आतड्याचे आरोग्य या पहिल्या स्तंभाबद्दल मागील वेळी जाणून घेतले. प्रतिकारशक्तीचा दुसरा स्तंभ आहे ताणतणाव नियोजन. आधुनिक जीवनपशैलीत हा सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे. आपण तणावात असताना ‘कॉर्टिसोल’ हे स्ट्रेस हार्मोन स्रवते. ते आपल्या प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम करते. त्यामुळेच एखादी व्यक्ती तणावाखाली असल्यास तिला नेहमीच संसर्ग होतो. त्याचप्रमाणे, अनेकदा आपण तणावात आहोत, हेच आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळेच, तणावाची लक्षणे समजून घेणे आणि ती कमी करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाचे ठरते. एखादी व्यक्ती तणाव कमी करण्यासाठी अनारोग्यकारक गोष्टींचा अवलंब करते. उदा. मद्यप्राशन, शीतपेये, तळलेले पदार्थ अधिक खाणे, जंकफूड, गोड पदार्थांचे सेवन, धूम्रपान आदी. या सर्वांचा पुढे एकूच आरोग्यावरही परिणाम होतो. तणावाचा डोकेदुखी, फ्लूसारखे संसर्गजन्य आजार, हदयविकार, मधुमेह, अस्थमा, जठरातील अल्सर आदींशी संबंध असतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- तुमची प्रतिकारशक्ती वाढवा, तणावाची पातळी कमी करा. 
- तणाव कमी करण्यासाठी योग्य आहार घ्या. 
- आहारात खालील पोषक घटक असणाऱ्या आहारांचा समावेश करा. 

क जीवनसत्त्व 
- तुम्ही ताज्या लिंबाचे काळीमिरीची पावडर घातलेल सरबत दिवसभरात अधूनमधून घेऊ शकता. विशेषत: सकाळी लवकर घ्यावे. 
- सिमला मिरची, संत्रा, आवळा सरबत, कोबी. इ.चा तुमच्या दिवसभरातील आहारात समावेश करा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मॅग्नेशियम 
- भिजविलेले बदाम खा. 
- राजमा, छोले, पालक तुमच्या जेवणात घ्या. 

पोटॅशियम 
- दिवसभरात केळी खा. शिजविलेल्या पालकाची भाजीही खा. 

ओमेगा ३ फॅटी ॲसिड्‌स: 
- रावस, बांगडा आदी प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड्‌स विपुल प्रमाणात असते. 
- जवस. तुमच्या दररोजच्या आहारात दोनतीन चमचे जवस घ्यायला विसरू नका. 
- तुम्ही वॉलनटचाही (अक्रोड) समावेश करू शकता. 

पाणी 
- दिवसभरात तीनचार लिटर पाणी प्या. 

इतर उपाय 
- आहारामध्ये कोणत्याही पदार्थाचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या प्रकृतीनुसार रिस्क फॅक्टर्स लक्षात घ्या. 
- चांगली सपोर्ट सिस्टीम तयार करा. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधा. 
- हसा आणि सर्व काळज्या विसरा. 
- वाचन करा. टीव्हीवर चांगले पाहा. 
- कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. 

ध्यान आणि प्राणायाम : दररोजचे ध्यान आणि दीर्घश्वसन ही जीवनशैली बनवायला हवी. येथून पुढे प्रत्येकासाठीच तणाव कमी करून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनदिन जीवनात या गोष्टींचा समावेश करणे बंधनकारक असेल. 

व्यायाम 
आठवड्यातून किमान पाचसहा दिवस दररोज ३० ते ४० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे, आपल्या मेंदूत ‘एंडॉर्फिन’ हे ‘हॅप्पी हार्मोन’ स्रवते. ते ‘स्ट्रेस हार्मोन’ कमी करून प्रतिकारशक्तीला चालना देते. 

मित्रमैत्रिणींनो, आपण या सर्वांमुळे तणावाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्याचप्रमाणे, आपण तणाव हाताळण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत. 
प्रतिकारशक्तीच्या तिसऱ्या स्तंभाबद्दल पुढील वेळी माहिती घेऊयात. 

loading image