Video : माझा फिटनेस : शारीरिक, मानसिक स्वास्थ्य महत्वाचे

निर्भय वाधवा, अभिनेता
मंगळवार, 7 एप्रिल 2020

जीवनात नेहमीच सकारात्मक राहणे, स्वास्थ्यासाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे जीवन शांत व ताजेतवाने होते. स्वास्थ्यासाठी घरामध्ये योग्यरीत्या शिजवण्यात आलेला पौष्टिक व संतुलित आहार, पुरेशी झोप व आरामासह जीवनामध्ये संतुलन राखणे आवश्‍यक आहे. नवी पिढी शारीरिक स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होईल, अशा सवयी अंगिकारत आहेत. प्रत्येकाने शरीराची योग्य काळजी घेत प्रथिने, कर्बोदके, मेद व जीवनसत्त्वांनी युक्‍त पौष्टिक आहार घेतला पाहिजे.

मी शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यसनांपासून दूर राहतो आणि दिवसातून किमान दोनदा व्यायाम करतो. माझ्या आहारामध्ये ब्रेकफास्टला अंडी आणि दोन वेळच्या आहारामध्ये चपात्या व पालेभाज्यांचा समावेश असतो. मी नियमितपणे व्यायामशाळेत जातो. यामुळे ॲण्ड टीव्हीवरील ‘कहत हनुमान जय श्री राम’मधील बालीच्या भूमिकेसाठी योग्य शरीरयष्टी राखण्यामध्ये मदत होते. प्रत्येकाने किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे. त्यामुळे लोक स्वत:ला हायड्रेटेड व उत्साही ठेवू शकतील. माझा दिवस उत्साहात सुरू करण्यावर विश्‍वास आहे. त्यासाठी मी सकाळी सात वाजता व्यायामशाळेत दोन तास घालवतो व त्यानंतर शूटसाठी जातो. मी पॅक-अपनंतर नियमितपणे व्यायाम करतो. स्नायूंमधील लवचिकता सुधारण्याचा व्यायाम आवर्जून करतो. त्यामुळे मला हाणामारीचे सीन्स करताना मदत होते. मी व्यायामामध्ये सूर्यनमस्कारचा समावेश करतो. हातांचे व्यायाम करताना सूर्यनमस्कारावर अधिक भर देतो. 

करियरच्या सुरवातीला मी दुःशासनची भूमिका साकारली होती. त्यावेळी मला वजन वाढवावे लागले. त्यानंतर मी महाराणा प्रतापची भूमिका साकारली होती, ज्यासाठी पुन्हा मला आणखी वजन वाढवावे लागले. हनुमानाची भूमिका साकारण्यासाठीही खूप वजन वाढवावे लागले होते. तेव्हापासून मी शरीरयष्टी कायम तशीच ठेवली आहे. मला कोणत्याच भूमिकेसाठी वजन कमी करावे लागले नाही. परदेस खान हा माझा जिवलग मित्र व ट्रेनर माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. मला त्याच्याकडून बॉडीबिल्डिंग ट्रेनिंग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. मुंबईमध्ये ट्रेनर आशिष सावनकर माझा फिटनेस गुरू आहे. 
शब्दांकन - अरुण सुर्वे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my fitness article nirbhay vadhava