Inner Engineering: Tasting the Fruit of Your Inner Self
सद्गुरू ( ईशा फाउंडेशन)
इनर इंजिनिअरिंग
सद्गुरू : ‘या जीवनाचा उद्देश काय आहे?’... हा प्रश्न तुमच्या मनात का उद्भवतो? समजा तुम्ही अत्यंत आनंदी किंवा परमानंदी आहात, तर तुम्ही हा विचार कराल का, की या जीवनाचा उद्देश काय आहे? नाही... कुठेतरी ते तुम्हाला त्रास देत आहे. मी काय करत आहे, याला कुठेतरी काहीच अर्थ नाही. म्हणून हा प्रश्न समोर आला आहे की, ‘जीवनाचा उद्देश काय आहे?’